AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात दंगल ही गोध्रा हत्याकांडावरची रिअ‍ॅक्शन होती: चंद्रकांत पाटील

आता इतक्या वर्षांना राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, | Chandrakant Patil

गुजरात दंगल ही गोध्रा हत्याकांडावरची रिअ‍ॅक्शन होती: चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
| Updated on: Mar 03, 2021 | 11:43 AM
Share

मुंबई: गुजरातमध्ये 2002 साली झालेली दंगल (Gujrat riots) ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिअ‍ॅक्शन) होती, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले, त्यानंतर गुजरातमध्ये दंगल झाली. त्यामुळे ही एक रिअ‍ॅक्शन म्हणावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. (BJP leader Chandrakant Patil on Gujrat riot)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या आणीबाणी ही एक चूक असल्याच्या कबुलीबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आता इतक्या वर्षांना राहुल गांधी यांना आणीबाणी ही चूक असल्याची उपरती होत आहे. मात्र, आणीबाणीमुळे कित्येक लोकांना त्रास सोसावा लागला, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं: नवाब मलिक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने आता भाजपला घेरलं आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये बोलताना ही मागणी केली आहे. 45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी कॉर्नेल विद्यापीठातील कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी ही चूक असल्याची जाहीर कबुली दिली. आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, काँग्रेसनं पक्ष म्हणून त्याचा कधीही फायदा करुन घेतला नाही. तेव्हा जे झालं आणि आज जे होत आहे, त्यात मोठा फरक आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

‘होय, आणीबाणी चुकच होती!’, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून पहिल्यांदाच जगजाहीर कबुली

Video: सभेला उशीर झाला तर तुम्ही काय कराल? प्रियंका गांधींनी काय केलं ते बघा!

PHOTOS : पुशअप्स, समुद्रात स्विमिंग आणि अ‍ॅब्स… ‘या’ कारणांमुळे सर्वत्र राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा

(BJP leader Chandrakant Patil on Gujrat riot)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.