Video | उद्धवसाहेब बिना लायसन्सचे ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर, थोरात प्रवासी, गुलाबरावांच्या फटकेबाजीनं पंढरपुरात हशा

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत विरोधकांची खिल्ली उडवली. गुलाबरावांच्या या किस्स्यामुळे भर सभेत चांगलाच हशा पिकला. ते पंढरपुरात बोलत होते.

Video | उद्धवसाहेब बिना लायसन्सचे ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर, थोरात प्रवासी, गुलाबरावांच्या फटकेबाजीनं पंढरपुरात हशा
gulabrao patil
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 12:09 PM

सोलापूर : राज्यातील माहाविकात आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते असा दावा भाजपकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं सत्ताधारी सांगत असतात. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर टीका केली आहे. सरकार काहीही केलं तर कोसळणार नाही हे सांगण्यासाठी त्यांनी गाडी, ड्रायव्हर, कंटडक्टर आणि प्रवाशी असा दाखला देत विरोधकांची खिल्ली उडवली. गुलाबरावांच्या या उदाहरणामुळे भर सभेत चांगलाच हशा पिकला. ते पंढरपुरात बोलत होते.

उद्धव ठाकरे ड्रायव्हार, अजित पवार कन्डक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी

“मला माहिती आहे, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागतं. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं काही चालू केलं की बिना लायसन्सचा ड्रायव्हर बसवून दिला. उद्धव ठाकरे ड्रायव्हार, अजित पवार कन्डक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की हा ड्रायव्हर अपघात करेल. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट व्होल्वो गाडी देण्यात आली. पण दोन वर्षामध्ये किती टेकड्या, पहाड आले. तरीही आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालत आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या टोलेबाजीमुळे सभेत चांगलीच खसखश पिकली.

टोपली फिरवणारे मुरारी वाजवणारे खासदार, आमदार झाले

तसेच पुढे बोलताना शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असे गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटले. त्यामुळे आता नारायण राणे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

सगळी धरणं भरलेत, नीट शेती करा; नायतर ह्याचं काय अन त्याचं काय, अनं मळ तंबाखू असं नको,अजित पवारांची टोलेबाजी

आमचे राज्यात 22 खासदार होणार, 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी : संजय राऊत

सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हात कापून बॅरिकेट्सवर लटकवलं

(gulabrao patil said mahavikas aghadi government will complete its five year tenure given example of driver conductor)

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.