Gulam Nabi Azad : राहुल गांधी यांना उपाध्यक्ष केल्यानंतर काँग्रेस बरबाद झाली.. चमचे पार्टी चालवू लागले.. काय आहे गुलाम नबी आझाद यांच्या राजीनामा पत्रात?

Gulam Nabu Azad : 'दुर्दैवाने पक्षात राहुल गांधींचा प्रवेश झाला आणि जानेवारी 2013 साली जेव्हा राहुल यांना पक्षाचे उपाध्यक्ष केले, तेव्हापासून त्यांनी पार्टीच्या सल्लागारांचे तंत्र पूर्णपणे नष्ट करुन ठेवले.'

Gulam Nabi Azad : राहुल गांधी यांना उपाध्यक्ष केल्यानंतर काँग्रेस बरबाद झाली.. चमचे पार्टी चालवू लागले.. काय आहे गुलाम नबी आझाद यांच्या राजीनामा पत्रात?
गुलाम नबी आझाद यांचे सोनिया गांधी यांना पत्रImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 1:26 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad resignation) यांनी शुक्रवारी काँग्रेस (Congress)  पक्ष सोडला. त्यांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. हे राजीनामे त्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे पाठवले आहेत. 3 पत्रांच्या राजीनामा पत्रात त्यांनी काँग्रेसविषयी बरेच लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे की- दुर्दैवाने जेव्हा पक्षात राहुल गांधी यांचा प्रवेश झाला आणि जानेवारी 2013 साली जेव्हा तुम्ही राहुल यांना पक्षाचे उपाध्यक्ष केले, तेव्हापासून त्यांनी पार्टीच्या सल्लागारांचे तंत्र पूर्णपणे नष्ट करुन ठेवले. आझाद एवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्यांनी पुढे लिहिले आहे की- राहुल गांधी यांच्या प्रवेशानंतर सगळ्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना साईड लाईन करण्यात आले आणि अनुभव नसलेल्या चमच्यांचा एक नवा ग्रुप उभा राहिला. दुर्दैवाने हेच सगळे पार्टीही चालवू लागले.

गुलाम नबी आझाद यांचे पत्र

गेल्या अनेक काळापासून गलाम नबी आझाद होते नाराज

आझाद गेल्या अनेक काळापासून पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. या महिन्यात 16 ऑगस्ट रोजी आझाद यांना जम्मू काश्मीर प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते, मात्र आजाद यांनी अवघ्या दोन तासात या पदाचा राजीनामा दिला होता. हे आपले डिमोशन असल्याचे त्यांनी सांगितले होते. 73 वर्षीय आझाद राजकारणाच्या अखेरच्या टपप्यात पुन्हा एकदा प्रदेश काँग्रेसची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक होते, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याऐवजी 47 वर्षीय विकार रसूल वानी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. वानी हे गुलाम नबी आझाद यांचे अत्यंत नीकटवर्तीय मानले जातात. बानिहालमधून ते आमदार म्हणून निवडूनही आले होते. आझाद यांना निर्णय आवडला नाही. काँग्रेस नेतृत्व आझाद यांच्या नीकटवर्तीयांना तोडत असल्याची भावना यातून निर्माण झाली, त्यामुळे आझाद अधिक नाराज झाल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही आझाद यांनी रोष केला होता व्यक्त

10 जनपथ म्हणजेच सोनिया गांधी यांच्या गुड लिस्टमधून गुलाम नबी आझाद बाहेर असण्याची ही पहिली वेळ नाही. 2008 सालीही त्यांना जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर कुरबुरी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर 2009 साली आंध्र प्रदेश काँग्रेसमध्ये झालेल्या वादावर तोडगा शोधण्याची जबाबदारी आझाद यांना देण्यात आली होती. त्यानंतर ते पुन्हा गुल लिस्टमध्ये आले आणि केंद्रीय मंत्री झाले. यावेळी मात्र त्यांचे पक्षश्रेष्ठींशी जमू शकले, तोडगा निघाला नसल्याने त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.

जी-23 गटातही आझाद होते सहभागी

काँग्रेसमधील अंतर्गत नाराज असलेल्या जी-23 या गटाचेही आझाद एक सदस्य होते. हा गट पक्षात मोठे अंतर्गत बदल करु इच्छित होता. आता या राजीनाम्यामुळे आझाद आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारने याचवर्षी गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. हे विशेष.

आझाद यांच्या राज्यसभेतील अखेरच्या वेळी मोदी भावूक

आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 15 जानेवारी 2021 साली संपुष्टात आला होता. त्यानंतर त्यांना दुसऱ्या राज्यातून पुन्हा राज्यसभेत संधी देण्यात येईल, असे आझाद यांना वाटत होते. मात्र काँग्रेसने त्यांना ही संधी पुन्हा दिली नाही. आझाद यांचा कार्यकाळ संपतानाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. 2021 साली मोदी सरकारने आझाद यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना हे पसंत पडले नव्हते. हा सन्मान आझाद यांनी नाकारायला हवा होता, अशी अनेक काँग्रेस नेत्यांची इच्छा होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.