खडसे, पाटील यांच्यातील आरोप -प्रत्यारोपानंतर जळगावात महाविकास आघाडीमध्ये फूट

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेदरम्यान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंवर  जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे.

खडसे, पाटील यांच्यातील आरोप -प्रत्यारोपानंतर जळगावात महाविकास आघाडीमध्ये फूट
एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 7:59 AM

जळगाव : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचार सभेदरम्यान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसेंवर  जोरदार टीका केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. खडसे, पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर आता जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे दिसून आले आहे.

दोन्ही पक्षाचे जिल्हाप्रमुख आमने-सामने

जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडीत एका व्यासपीठावर आले खरे, मात्र बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान खडसे व पाटील यांच्यात आरोप – प्रत्यारोपाचे राजकारण रंगले. या दोन नेत्यानंतर आता त्यांच्या समर्थकांमध्ये देखील जुंपल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना जिल्हाप्रमुख  समाधान महाजन  यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेच अवैध धंदे सूर असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

बोदवड निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे नेत एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली होती. जे अनेक वर्ष आमदार राहिले आहेत, जे मंत्री राहिले आहेत, त्यांनी पाहावे माझ्या मतदाससंघातील रस्ते कसे हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत असल्याचे पाटील यांनी म्हटले होते. असं म्हणत पाटील यांनी खडसेंना टोला लगावला होता. तर दुसरीकडे खडसे यांनी देखील आपल्यावरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर गुलाबराव पाटलांना आपल्या वक्तव्यावरून माफी मागावी लागली होती.

संबंधित बातम्या 

Goa Elections 2022: गोव्यात आप आणि तृणमूल एकत्र लढणार का? वाचा काय म्हणाले केजरीवाल

ओमिक्रॉनचा धसका! उत्तर प्रदेशात रॅलीवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, थेट कोर्टाचं मोदींना आवाहन

Rane vs Shivsena : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राणे विरुद्ध शिवसेना, वादास कारण की…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.