Gunratna Sadavarte : ‘इंदिराजींच्या काळात होती, तशी आणीबाणीची स्थिती आज महाराष्ट्रात’ गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप
सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहातून जामिनावर सुटका झाली. यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्तेंना (gunaratna sadavarte) मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) आक्षेपार्ह विधान प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहातून (arther road jail) जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर आज माध्यमांशी बोलताना सदावर्तेंनी, ‘संघर्षाला आम्ही आनंदाने स्वीकारले,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यात आणीबाणीची स्थिती असल्याचं बोलून दाखवलंय. ते म्हणाले की,’ 1857 पासून जो संघर्ष देशाच्या इतिहासाचा हिस्सा आहे, तो संघर्ष आम्ही आनंदाने स्वीकारलेला आहे. संघर्षाला स्वीकारल्याशिवाय विजयी होता येत नाही. मुश्किलो के आगे जीत होती है. सत्य परेशान हो सकता है पराभूत नाही,’ असं सदावर्ते जामिनावर सुटका झाल्यानंतर मध्यमांशी बोलतांना म्हणालेत.
पत्रकारांवर सेन्सॉरशीप आणण्याचा प्रयत्न
पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘याद करो वो दिन. हेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली होती. तेव्हाही पत्रकारांवर सेन्सॉरशीप लादल्याचा प्रयत्न झाला. याहीवेळी पत्रकारांची उलटतपासणी. पण 44वी घटनादुरुस्ती भारताची वाचा आणि आजही तुम्ही आणीबाणीसारखी परिस्थिती ओढावून ठेवली असेल, तर राज्यात केंद्र सरकारनं, राष्ट्रपतींनी कॉल घेण्याची गरज आहे,’ असं सदावर्ते यावेळी म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांवर सदावर्तेंची टीका
पुढे बोलताना सदावर्तेंनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री ठाकरेंकडून आणीबाणीसारखी वागणून अपेक्षित नाही. आमच्यासमोर जी वेळ आणली त्याला आम्ही सामोरे गेलो. कारण, आमच्यासोबत सर्वसामान्य होते. आज आणीबाणी आहे का, असं सरकारला सूचवायचंय का, असा प्रश्न मी उपस्थित करतोय. इंदिराजींच्या केसमध्येही राईट टू एक्स्प्रेशनवर चर्चा झाली होती. माझ्याही केसमध्ये तेच झालं. इंदिराजींची आणीबाणी आणि आताचा काळ हा सेमच वाटतोय. आम्ही निष्ठेनं कष्टकऱ्यांसाठी काम करतो,’ असं सदावर्ते यावेळी म्हणालेत.