Tejas Thackeray : तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांची बॅनरबाजी; लवकरच पक्षात मोठी जबाबदारी मिळणार!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना शिवसैनिकांनी बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Tejas Thackeray :  तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची बॅनरबाजी; लवकरच पक्षात मोठी जबाबदारी मिळणार!
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:16 AM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून बॅनरच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री (Matoshree) बाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर युवानेते तेजस साहेब ठाकरे यांना वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकुर छापण्यात आला आहे. शिवसेनेमध्ये सध्या मोठे बंड सुरू आहे. अनेक महत्त्वाचे नेते शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे गटात सामील झाले. अशा स्थितीमध्ये आता सेनेला सावरण्याची जबाबदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर आहे. युवानेते आदित्य ठाकरे देखील राज्यभरात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून  शिवसैनीकांशी संवाद साधत आहे. आता तेजस ठाकरे हे देखील सक्रिय राजकारणात उतरण्याची शक्यता आहे.  शिवसेनेमधील सध्याची परिस्थिती पहाता युवा सेनेची जबाबदारी ही तेजस ठाकरे यांच्यावर येऊ शकते.

शिवसैनिकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेनेची सध्याची परिस्थिती पहाता तसेच निर्माण झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर लवकरच उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या खांद्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. तसे संकेत मातोश्रीकडून देखील मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसैनिकांनी देखील तयारी सुरू केली असून, तेजस यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री परिसरात अनेक भव्य असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर  युवानेते तेजस साहेब ठाकरे यांना वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा असा मजकुर छापण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच तेजस ठाकरे यांना शिवसेनेत एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे मैदानात

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली आणि शिवसेनेत फूट पडली. शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे नेते हे शिंदे गटात सामील झाल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. आता ही पोकळी भरून काढण्याचे काम आदित्य ठाकरे करताना दिसून येत आहे. ते शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनीकांशी संवाद साधत आहेत. तसेच त्यांनी या बंडानंतर मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी शिवसैनिकांचे मेळावे घेतल्याचे पहायला मिळाले. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर त्यांचे बंधू तेजस ठाकरे देखील राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.