काँग्रेसमधून भाजपत आलेले हार्दिक पटेल पिछाडीवर
हार्दिक पटेल पिछाडीवर
मुंबई : भाजपचे युवा नेते हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत. अहमदाबादमधल्या वीरमगाम मतदारसंघात हार्दिक पटेल (Hardik Patel) निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांचा मुकाबला काँग्रेसचे लाखा भरवाड यांच्याशी होतोय. मागच्या दोन टर्मपासून इथं काँग्रेसचा आमदार आहे.
वीरमगाम विधानसभा हा पटेलांचा गड मानला जातो. म्हणूनच भाजपनं हार्दिक पटेलांना उमेदवारी देऊन विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. वीरमगाम मतदारसंघात 55 हजार मतं ठाकूर समाजाची, 50 हजार मतं पटेलांची, तर दलित समाजाची मतं 25 हजारांच्या घरात आहेत. मात्र आता हार्दिक पटेल पिछाडीवर आहेत.
हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी लढा दिला. तिथूनच हे तरूण नेतृत्व उदयास आलं. हार्दिक पटेल यांनी आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र गुजरात निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हे लोकांना पटलेलं दिसत नाही. कारण हार्दिक पटेल पिछाडीवर पडलेले पाहायला मिळत आहेत.
हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचं नेतृत्त्व करतात. पाटीदार समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे हा समाज भाजपच्या दिशेने हार्दिक पटेल यांच्या रुपात वळेल, असं सांगितलं जातं होतं. मात्र हार्दिक पटेल पिछाडीवर पडले आहेत.