AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमळ हाती घेताच भाजपविरोधी जुनं ट्विट डिलीट, नेटकरी म्हणतात, ‘भूतकाळ पाठ सोडणार नाही’

हार्दिक यांनी वारंवार भाजपवर टीका केली आहे. भाजप कसा धर्मांध पक्ष आहे. हे त्याने दाखवून दिलं. ईडी, देशदोह यासारख्या मुद्द्यांवरून भाजपला घेरलं त्याच पक्षात त्यांनी आज प्रवेश केला. त्यामुळे त्यांचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय.

कमळ हाती घेताच भाजपविरोधी जुनं ट्विट डिलीट, नेटकरी म्हणतात, 'भूतकाळ पाठ सोडणार नाही'
| Updated on: Jun 02, 2022 | 6:26 PM
Share

मुंबई : हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाची देशभर चर्चा होतेय. आधी काँग्रेससोबत वैचारिक बांधिकली करणारे हार्दिक पटेल यांनी अचानकपणे भाजपमध्ये जाणं अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. मागच्या सहा वर्षांच्या सार्वजनिक जीवनात हार्दिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पण आता भाजप लोकहिताचा विचार करणारा पक्ष आहे म्हणत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचं हे वैचारिकदृष्ट्या बदलणं अनेकांसाठी आश्चकश्चर्याचा धक्का देणारं आहे. त्यामुळे हार्दिक यांची जुनी विधानं त्यांचे ट्विट आता व्हायरल (Hardik Patel Viral Tweet) होऊ लागले आहेत. अश्याच एका जुन्या ट्विटवरून नेटकऱ्यांनी हार्दिक यांना प्रश्न विचारले आहेत.

हार्दिक यांचं जुनं ट्विट

हार्दिक यांनी वारंवार भाजपवर टीका केली आहे. भाजप कसा धर्मांध पक्ष आहे. हे त्याने दाखवून दिलं. ईडी, देशदोह यासारख्या मुद्द्यांवरून भाजपला घेरलं त्याच पक्षात त्यांनी आज प्रवेश केला. त्यामुळे त्यांचं एक जुनं ट्विट व्हायरल होतंय. यात त्यांनी जर एखाद्याला सकाळी देशद्रोही जाहीर केलं आणि त्याने संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्याला देशभक्ताांच्या पंगतीत बसवलं जातं, असं ट्विट हार्दिक यांनी 2016 मध्ये केलं होतं. ते ट्विट आता व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

हार्दिक यांचं हे ट्विट शेअर करत नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलंय, ‘भूतकाळ पाठ सोडणार नाही.’

हे ट्विट डिलीट का केलं, असा सवाल एका नेटकऱ्याने हार्दिक यांना विचारला आहे.

आणखी एकजण म्हणतो की “हे ट्विट डिलीट करायला खूप उशीर झाला.”

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.