हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेची शक्यता, पोलीस मारहाण प्रकरणातील जामीन रद्द करण्याची मागणी

हर्षवर्धन जाधव यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचा दावा करत सरकारी वकील डी आर काळे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला (Harshavardhan Jadhav may get arrested)

हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेची शक्यता, पोलीस मारहाण प्रकरणातील जामीन रद्द करण्याची मागणी
हर्षवर्धन जाधव
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 8:14 AM

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा गैरवर्तन केल्याचा सरकारी वकिलाने आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांना मारहाण केल्याच्या जुन्या प्रकरणातील जामीन रद्द करण्याची मागणी केली जात आहे. (Harshavardhan Jadhav may get arrested in beating Police Case)

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका जुन्या प्रकरणातील जामीन अर्ज रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना जामीन मिळाला होता. पुन्हा गैरवर्तन न करण्याच्या अटीवर जाधवांना जामीन मंजूर झाला होता.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्याकडून गैरवर्तन झाल्याचा दावा करत सरकारी वकील डी आर काळे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी मंजूर झालेला जामीन रद्द का करु नये, यासाठी हर्षवर्धन जाधव यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

दुचाकीस्वार मारहाण प्रकरणातही अटक

हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, जाधव यांच्याकडून अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचं कारण 15 डिसेंबरला सांगण्यात आलं होतं. अखेर पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना रिसतर अटक केली होती.

अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या सहकारी इशा झा या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. अमन चड्डा यांनी तक्रारीत आपले आई वडील जखमी झाल्याचं म्हटलं होतं.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई
  • काँग्रेस नेते रायभान जाधव यांचे हर्षवर्धन हे पुत्र
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • मनसे सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या :

ना आदित्य हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव; मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक, रात्र तुरुंगातच काढावी लागणार

हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश

(Harshavardhan Jadhav may get arrested in beating Police Case)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.