हर्षवर्धन पाटलांच्या धरणं आंदोलनाला यश, ऊर्जा मंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी रात्री आठ वाजता महावितरण कंपनीचे अधिकारी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी आले. मात्र, तोडगा निघाला नाही व आम्ही फक्त निवेदन स्वीकारण्यासाठी आलो आहोत, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी महावितरण कंपनीच्या दारासमोरच आंदोलन सुरू केले.
इंदापूर : तालुक्यात गेल्या 12 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचं काम सुरू होतं. थकीत वीज बिलापोटी ही कारवाई सुरू असल्याचं महावितरणकडून (MSEDCL) सांगण्यात येत होतं. मात्र या महावितरण कंपनीच्या निर्णयाच्या विरोधात इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने सुरू होती. विशेष बाब म्हणजे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या निवासस्थानासमोरही एक दिवस शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. शेतकऱ्यांची कोणत्याही मागणीची दखल घेतली जात नसल्याने अखेर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) मैदानात उतरले. पाटील यांच्या उपस्थितीत 31 तास आंदोलन करण्यात आल्यानंतर अखेर राज्य सरकारकडून मागण्या मान्य करण्यात आल्या.
शनिवारी सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आणि महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी रात्री आठ वाजता महावितरण कंपनीचे अधिकारी तोडगा काढण्यासाठी आंदोलनस्थळी आले. मात्र, तोडगा निघाला नाही व आम्ही फक्त निवेदन स्वीकारण्यासाठी आलो आहोत, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर हर्षवर्धन पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी महावितरण कंपनीच्या दारासमोरच आंदोलन सुरू केले. चर्चा फिसकटली आणि आक्रमक झालेले शेतकरी व पाटील यांनी महावितरण कंपनीच्या दारासमोर आपले आंदोलन सुरू केले. याच वेळी हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या पिठलं भाकरी आणि ठेच्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर महावितरण कंपनीच्या दारासमोरच रात्रभर मुक्काम केला. अशा कडाक्याच्या थंडीतही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महावितरण कंपनीच्या दारासमोर रात्रभर मुक्काम केला.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे कालपासून महावितरण कंपनीच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे या धरणे आंदोलनाला यश आले आहे. pic.twitter.com/MBD5SXpg6y
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) November 28, 2021
‘वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या अटीवर आंदोलन मागे’
आज सकाळी पुन्हा आंदोलन सुरू झाले महावितरण कंपनीचे अधिकारी आणि हर्षवर्धन पाटील यांच्या बैठका होत होत्या. मात्र, तोडगा निघत नव्हता अखेर 31 तासांच्या नंतर या आंदोलनाला यश आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला असल्याचे पाटील यांनी सांगितले. एक हाऊस पावरला पाचशे रुपये वीज भरणा करण्याच्या मागणीला करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले. तसंच तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या अटीवर हे आंदोलन संपवण्यात आले.
हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनी विरोधात शनिवार दि. २७ नोव्हेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्याचा आज दुसरा दिवस असून जोपर्यंत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे. (2/2)@Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) November 28, 2021
‘दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला’
दरम्यान, या आंदोलनावर भाष्य करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधत उपरोधात्मक टीका केली. भरणे म्हणाले भाऊ तुम्ही कारखान्याची बिल वेळवर दिली असती तर शेतकऱ्यांवर तशी वेळ आलीच नसती. भाऊ तुम्ही सहकाराचे तज्ञ आहात शेतकऱ्यांच्या या प्रश्नांबद्दल आपण लक्ष दिल्याने तुमचे मी अभिनंदनच करतो. खरंच शेतकरी मोठ्या संकटात आहे. तुम्हाला जर खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल तर तुम्ही उसाचे बिल वेळेवर द्या, असे म्हणत राज्यमंत्री भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला आहे.
इतर बातम्या :