धनंजय मुंडे प्रकरणात भाजप तोंडघशी पडलं, या प्रकरणातही चौकशीत सत्य बाहेर येईल : हसन मुश्रीफ
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय.
कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय. भाजप धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची बदनामी करण्याची सवय लागल्याचा आरोप केला. ते कोल्हापुरात बोलत हेतो (Hasan Mushrif criticize BJP over Pooja Chavan suicide case allegations).
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्यावेळी देखील असंच झालं होतं. धनंजय मुंडे यांच्या वेळी भाजप तोंडघशी पडले आहे. या प्रकरणाचीही चौकही झाली पाहिजे आणि त्यातूनच सत्य समोर येईल. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करायची भाजपला सवय लागलीय. भाजप सत्ता यावी म्हणून काहीही आरोप करत आहे. त्यांचा अनेकदा भ्रमनिरास झालाय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन शहानिशा झाली पाहिजे. एखाद्या माणसाला बदनाम करणं हे काही योग्य नाही.”
“गोपीचंद पडळकर यांची लायकी अजित पवार यांनी सांगितली आहे. या आधी त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती त्यावेळी मीही गोप्या पडळकरची लायकी दाखवली आहे. लायकी नसणारी माणसं बोलतायत. मला वाटतं त्यांचा बोलावता धनी वेगळा असावा. देवेंद्र फडणवीस त्यांचे बोलावते धनी आहेत असं ठामपणे वाटतंय. परवा सदाभाऊ खोत यांनी पवारांवर टीका केली, आता पडळकर बोलले. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी अशा लोकांना आवरलं पाहिजे. नाहीतर त्यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीसच आहेत असा आम्ही याचा अर्थ काढू. गरज आहे,” असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना सत्ता गेल्याचं दुःख झालंय हे क्षणोक्षणी दिसतंय, असाही टोला मुश्रीफ यांनी फडणवीसांना लगावला. शिवजयंती उत्सवावरील निर्बंधांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. संख्या वाढली तरी टीका होते. खबरदारी घेतली तरी टीका होते. आम्ही काय करायचं?”
हेही वाचा :
अमित शाहांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य वैफल्यातून; हसन मुश्रीफांचा टोला
कडकनाथ कोंबड्या मागे लागल्या की खोतांना कळेल; शरद पवारांना डिवचल्यानंतर मुश्रीफांचं उत्तर
अखेर ग्रामसभांना परवानगी, कोरोना नियमांचं पालन करावं लागणार
व्हिडीओ पाहा :
Hasan Mushrif criticize BJP over Pooja Chavan suicide case allegations