चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?; हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. (hasan mushrif derogatory statement against chandrakant patil)
कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा तोल घसरला आहे. चंद्रकांतदादांवर सडकून टीका करताना चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती कुठून आली?, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. टीका करण्याच्या नादात मुश्रीफ यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्यावर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. (hasan mushrif derogatory statement against chandrakant patil)
चंद्रकांत पाटील भित्रे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपच्या आयटीसेलच्या प्रमुखाने आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी माफी मागा नाही तर परिणामांना सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यावर मीडियाशी संवाद साधताना मुश्रीफ यांनी हे विधान केलं. मी फक्त मीडियासेल प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याप्रकरणी भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती. पण चंद्रकांत पाटलांना एवढी मस्ती आली कुठून? त्यांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. त्यांना कोल्हापुरातून पळून जावं लागलं आहे, अशी घणाघाती टीकाही मुश्रीफ यांनी केली.
योग्यवेळी उत्तर देऊ
पाटील कोल्हापुरातून पळून गेले. पुण्यात एका महिलेला डावलून तिच्या मतदारसंघात उभे राहिले. यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येते. गेल्या मंत्रिमंडळात अपघातानेच त्यांना दोन नंबरचे स्थान मिळाले होते. योग्यावेळी त्यांना उत्तर देऊ, असं मुश्रीफ म्हणाले.
सरकार 25 वर्षे चालणार
कोल्हापुरातून पळून गेलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक आणि सोज्वळ व्यक्तीवर बोलणं योग्य नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, राजकारण किती करायचं याला काही मर्यादा आहेत की नाही? असा संतप्त सवाल करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असो की चंद्रकांत पाटील, भाजपचे सर्व नेते सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. त्यांना सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करू देत की काहीही आरोप करू देत, हे आघाडी सरकार पाच नाही तर 25 वर्षे चालणार आहे, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते मुश्रीफ?
‘भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल (Naveen Kumar Jindal) यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा येतील बघा” असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.
काय आहे प्रकरण?
भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली होती. (hasan mushrif derogatory statement against chandrakant patil)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 4 April 2021https://t.co/Q2a76Uv52n
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखतंय, पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर? भाजप नेत्याचे वक्तव्य
शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद, चालण्याचीही परवानगी
शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार
(hasan mushrif derogatory statement against chandrakant patil)