Chandrakant Patil Apologized : चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या ‘त्या’ विधानाबाबत व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले…
मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली होती. त्यानंतर सुळे म्हणाल्या की, आपण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या दिल्ली दौऱ्यावर संपर्क साधला होता.
मुंबई – भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळेंबाबत (Supriya Sule) केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी राजकारणात न राहता ‘तुम्ही राजकारणात का आहात, घरी जाऊन स्वयंपाक करा. दिल्लीला जा किंवा स्मशानात जा, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) महिला नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरती जोरदार हल्ला केला होता. तसेच समस्त महिलांचा त्यांनी अवमान केला असून माफी मागावी अशी महिलांनी मागणी केली होती. आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबतत दिलीगिरी व्यक्त केली आहे. 12 महिला आमदार आणि 5 महिला खासदार असणाऱ्या पार्टीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. सुप्रीया सुळेंबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो. मी ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे त्यांना अपमानित व्हावं लागलं यासारखं आयुष्यात कोणतं दुःख नाही. मी समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अखेर चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली होती. त्यानंतर सुळे म्हणाल्या की, आपण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या दिल्ली दौऱ्यावर संपर्क साधला होता. पण आरक्षणाला मंजुरी मिळण्यासाठी आपण काय केले याचा तपशील त्यांनी दिला नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे युतीचे सरकार आहे. बुधवारी भाजपच्या आंदोलनादरम्यान पाटील यांनी सुळे यांच्यावर निशाणा साधत ‘तुम्ही राजकारणात का आहात, घरी जाऊन स्वयंपाक करा. दिल्लीला जा किंवा स्मशानात जा, पण आम्हाला ओबीसी आरक्षण द्या. लोकसभा सदस्य असूनही मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ कसा काय लागला, याचे भान नाही.
राष्ट्रवादीची बोली – पाटील मनुस्मृतीवर विश्वास ठेवतात
पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण पाटील यांचे नाव न घेता म्हणाल्या की, तिकीट कापून महिला आमदाराची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने दोन वेळा संसदरत्न (चांगल्या कामगिरीसाठी) मिळालेल्या खासदाराचा अवमान केला आहे. तसेच ‘तुम्ही मनुस्मृतीवर विश्वास ठेवता हे आम्हाला माहीत आहे. पण आम्ही आता गप्प बसणार नाही.