मुख्यमंत्र्यांचं घरी बसून काळजीपूर्वक काम, आम्ही सर्व त्याचे साक्षीदार : राजेश टोपे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत, असे राजेश टोपे (Rajesh Tope Comment On BJP taunts CM Uddhav Thackeray) म्हणाले

मुख्यमंत्र्यांचं घरी बसून काळजीपूर्वक काम, आम्ही सर्व त्याचे साक्षीदार : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 6:31 PM

जालना : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. ते आम्हाला वरुन सूचना देतात,” असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. (Health Minister Rajesh Tope Comment On BJP taunts CM Uddhav Thackeray)

“राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत, एक मातोश्रीमध्ये, तर दुसरे राज्यभर फिरत आहेत,” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांवर निशाणा साधला होता. तर आज ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी “राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, मंत्रालयातून काम करणारे अजित पवार हे दुसरे मुख्यमंत्री, तर शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत” अशी टीका  केली होती. या टीकेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलं.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

राजेश टोपे काय म्हणाले?

“मुख्यमंत्री घरी बसून खूप काळजीपूर्वक काम करत आहेत. आम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहोत. मुंबईतील मिटींगसाठी ते स्वत: बाहेर पडून उपस्थित राहत आहेत,” असे राजेश टोपे म्हणाले.

“राज्यातील सर्व विभागामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक आठवड्याला संपूर्ण राज्याची माहिती घेण्याचे काम कलेक्टर, कमिशनर, एसपीकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आम्ही स्वतः घेत असतात. त्यावेळी ते सूचना देत असतात. टीम लीडर म्हणून त्यांनी सर्वांना सूचना देणं हेच अभिप्रेत आहे. आमच्यासारख्या लोकांनी फ्रंटवर जाऊन काम करणे हे अभिप्रेत आहे आणि ते आम्ही करतो आहोत,” असेही राजेश टोपेंनी यावेळी सांगितले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला सूचना देतात. ही योग्यच गोष्ट आहे. अजिबात चुकीचा काहीच विषय नाही. ते जिथे गरजेचे आहे तिथे तत्परतेने लक्ष देत आहेत. एवढं मी खात्रीपूर्वक सांगेन,” असेही राजेश टोपेंनी सांगितले. (Health Minister Rajesh Tope Comment On BJP taunts CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी वाढदिवशी मराठा समाजासोबत असल्याचा विश्वास द्यावा, आशीर्वाद मिळेल : विनायक मेटे

“एक मुख्यमंत्री ‘मातोश्री’त, दुसरे राज्यभर फिरतात” चंद्रकांत पाटलांचे ‘एका दगडात दोन पक्षी’

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.