धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही : आरोग्यमंत्री

राज्यातील सर्व धार्मिक स्थळं लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरावरुन केली जात (Health minister Rajesh Tope On Religious Places) आहे.

धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही : आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 6:44 PM

अहमदनगर : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. ही धार्मिक स्थळं पुन्हा खुली करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. राज्यातील सर्व धार्मिक स्थळं लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरावरुन केली जात आहे. मात्र धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंग हे पालन होणार नाही, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. (Health minister Rajesh Tope On Religious Places)

धार्मिक स्थळे सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपे यांनी विचारले असता ते म्हणाले, धार्मिक स्थळ, जिम, विमान सेवा सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र धार्मिक स्थळांमध्ये लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही.

जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिकस्थळ सुरु करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगून वेळ लागला तरी हरकत नाही असे राजेश टोपे म्हणाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा गुणी आणि चांगला कलावंत होता. मात्र त्याची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे, असे राजेश टोपे म्हणाले. या प्रकरणी पोलीस त्यांचं काम करत आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र यात कोणी राजकारण करु नये, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान नुकतंच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी “मंदिर पुन्हा सुरु करावी, अशी विनंती सरकार दरबारी करा,” अशी मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली.

यावेळी राज ठाकरेंनी “धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? असा प्रश्न विचारला. तसेच त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? असेही राज ठाकरेंनी सांगितले. (Health minister Rajesh Tope On Religious Places)

संबंधित बातम्या : 

त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कृष्णकुंजवर, मंदिर उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? राज ठाकरेंचा सवाल

Pune Ganeshotsav | गणेशमूर्तीची खरेदी ऑनलाईन, मिरवणूक नाही, पुणे पोलिसांची नियमावली

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.