संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; विशेष पीएमएलए कोर्टात जामीनासाठी अर्ज
शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगामध्ये आहेत. त्यांनी आता जामीनासाठी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे.

Image Credit source: tv9 marathi
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या पत्राचाळ प्रकरणात तुरुंगामध्ये आहेत. त्यांनी आता जामीनासाठी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या लीगल टीमकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या संजय राऊत हे अर्थर रोड जेलमध्ये आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. त्यामुळे सुनावणी झाल्यास आज तरी त्यांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.