AUDIO | 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल

शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर समोर आली आहे (Shivsena MLA Santosh Bangar Call Recording)

AUDIO | 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, शिवसेना आमदाराची ऑडिओ क्लीप व्हायरल
शिवसेना आमदार संतोष बांगर
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 12:59 PM

हिंगोली : गाडी मिळण्यास दोन तास उशीर झाल्यामुळे हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळत आहे. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर (Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar) यांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. 20 मिनिटात गाडी पाठव, नाही तर पेट्रोल टाकून फुकून देईन, असा दमच बांगर यांनी भरल्याचं संबंधित ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळतं. या कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर समोर आली आहे. (Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar alleged Call Recording Audio Viral)

काय आहे संवाद?

गाडी पाठवणारी व्यक्ती : हॅलो

आमदार संतोष बांगर : हा साहेब

गाडी पाठवणारी व्यक्ती : हा दादा, गाडी आता इथून निघाली थाळीगावहून… ती गाडी अर्ध्या-पाऊण तासात पोहोचेल बघा तिथे तुम्हाला.

आमदार संतोष बांगर : लय बोर व्हायले बघा मी, इमानदारीने… तुम्हाला खोटं सांगत नाही मी.. एकही गाडी 108 ची चालू देणार नाही… मी सांगतो उभ्या गाडीत रॉकेल टाकून फुकून देईन

गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा.. दादा..

आमदार संतोष बांगर : काय दादा-दादा… जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला जायचंय आणि तुम्ही म्हणता की गाडी नाही. दोन घंटे झाले वाट पाहून राहिलो

गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा बरोबर आहे, पण दोन गाड्या नांदेडला गेल्या. थाळीगावहून गाडी पाठवतो.

आमदार संतोष बांगर : दोन तासापासून राहते का?

गाडी पाठवणारी व्यक्ती : बरोबर आहे

आमदार संतोष बांगर : मी तुम्हाला सांगतो, मला 20 मिनिटात गाडी पाहिजे तिथे, नाहीतर उद्यापासून… गाडी मी पेट्रोल टाकून फुकून देईन पाहा.

गाडी पाठवणारी व्यक्ती : काहीच प्रॉब्लेम नाही

आमदार संतोष बांगर : मला लवकरात लवकर गाडी पाहिजे. दोन तास झाले मी वेट करुन राहिलो तुमच्या गाड्यांची

गाडी पाठवणारी व्यक्ती : मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलंय

आमदार संतोष बांगर : काय धंदा झाला का… दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हद्द झाली. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष… त्याला संभाजीनगरला न्यायचं आहे. त्याची तब्येत बराबर नाही.. आणि तुम्ही असे करायला लागले. चुकीचं नाहीतर काय तुमचं (Shivsena MLA Santosh Bangar Call Recording)

गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा बरोबर आहे

आमदार संतोष बांगर : मला काही सांगू नका.. ताबडतोब 20 मिनिटात गाडी आली पाहिजे तिथे… दोन घंट्यापासून थाळीगावहून गाडी येते?

गाडी पाठवणारी व्यक्ती : दादा आली आहे गाडी आता तिथं

आमदार संतोष बांगर : बाकीची कामं सोडा आणि ती कामं करा आधी

गाडी पाठवणारी व्यक्ती : हो दादा, गाडी पाठवतो

ऐका ऑडिओ क्लीप :

संबंधित बातम्या :

शिवसेना आमदारांकडूनच सोशल डिस्टन्सिंग फज्जा, संतोष बांगर यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार

(Hingoli Kalamnuri Shivsena MLA Santosh Bangar alleged Call Recording Audio Viral)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.