हिंगोलीत शिवसेनेला पालकमंत्र्यांचं वावडं? वर्षा गायकवाडांच्या सर्व कार्यक्रमांकडे शिवसेना नेत्यांची पाठ

वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एकाही कार्यक्रमाला शिवसेना आमदार, खासदार, सभापतींसह नगरसेवकांचीही उपस्थिती पाहायला मिळाली नाही. त्यामुळे हिंगोलीतील शिवसेना नेत्यांना पालकमंत्र्यांचं वावडं आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.

हिंगोलीत शिवसेनेला पालकमंत्र्यांचं वावडं? वर्षा गायकवाडांच्या सर्व कार्यक्रमांकडे शिवसेना नेत्यांची पाठ
कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 5:49 PM

हिंगोली : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हिंगोली दौऱ्यावर होत्या. गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. या दोन दिवसांत त्यांनी हिंगोली शहरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. शहरात बांधण्यात आलेल्या नगर परिषदेच्या इमारतीसह अन्य तीन इमारतींचं उद्घाटनही वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र, गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एकाही कार्यक्रमाला शिवसेना आमदार, खासदार, सभापतींसह नगरसेवकांचीही उपस्थिती पाहायला मिळाली नाही. त्यामुळे हिंगोलीतील शिवसेना नेत्यांना पालकमंत्र्यांचं वावडं आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. (Absence of ShivSena leaders in Hingoli Guardian Minister Varsha Gaikwad’s program)

महत्वाची बाब म्हणजे काल जिल्हा परिषदेत कोरोना योद्ध्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष गैरहजर राहिले. त्यामुळे जिथं पालकमंत्री तिथं शिवसेना नेत्यांची अनुपस्थिती जाणवत आहेत. या प्रकारामुळे हिंगोलीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्याबाबत वर्षा गायकवाड यांनाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मी माझे कार्यक्रम करत आहे. लोकांकडे लक्ष देत नाही, असा शब्दात त्यांनी शिवसेना नेत्यांच्या गैरहजेरीवर जास्त बोलणं टाळलं आहे.

मला कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती- आमदार बांगर

दुसरीकडे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना याबाबत विचारलं असता, मी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी माझ्या मतदारसंघात गेले होतो. त्यामुळे शिवसेनेची सर्व टीम माझ्यासोबत होती. मला कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती. तर नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्या दिवशी मी दौरा करत होतो, असं कारण आमदार बांगर यांनी पुढं केलं आहे. दरम्यान, मागे एका बैठकीत शिवसेनेकडून पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी हिंगोलीत स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे.

पालकांनी फी कपातीच्या अडचणींसंदर्भात दाद कुठे मागायची?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 15% फी कपाती संदर्भात शिक्षण विभागाने नवीन शासन निर्णय लागू केलाय असल्याची माहिती दिली. मात्र, याची अंमबजावणी कशी होणार आणि पालकांची या संदर्भात तक्रार असेल,ती कुठे करायची, असं विचारलं असता या संदर्भात विभागीय शुल्क नियामक समिती स्थापण केली आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. विभागीय स्तरावर समिती स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्ष उच्च न्यालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांच्यांकडे जाऊन पालक दाद मागू शकतात, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

शासन निर्णय काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा

शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं तर,15% फी माफी संदर्भात अध्यादेश आणला जाणार होता. यासंदर्भात घोषणा झाली होती. मात्र, शासन निर्णय जारी करण्यात का आला. यासदंर्भात विचारलं असता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे, अशी माहिती दिली.

इतर बातम्या :

‘पत्र गेलेलं आहे, वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आलं नसेल’, 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शरद पवारांचा राज्यपालांना टोला

राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी; नाथाभाऊ जळगावात भाजपला अस्मान दाखवणार?

Absence of ShivSena leaders in Hingoli Guardian Minister Varsha Gaikwad’s program

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.