बाळासाहेब ते उद्धव ठाकरे, शिवसेना-मनसेतील साद-प्रतिसादाचा इतिहास
भूतकाळात अनेकदा शिवसेनेच्या गोटातून राज ठाकरे यांना साद घालण्यात आली आहे (History of Shivsena MNS reunion efforts).
मुंबई : सध्या महाराष्ट्रात कंगना रनौतने मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातून ठाकरे ब्रँडसाठी राज ठाकरेंना साद घातली. यानंतर मनसे आणि शिवसेना जवळ येणार का? या विषयी जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, हा अशाप्रकारचा पहिलाच प्रसंग नाही. याआधीही भूतकाळात अनेकदा शिवसेनेच्या गोटातून राज ठाकरे यांना साद घालण्यात आली आहे (History of Shivsena MNS reunion efforts).
राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष स्थापन केला. त्याकाळात शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांनी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ अशी भावनिक सादराज ठाकरेंना घातली होती. राज-उद्धव एकत्र यावेत यासाठी काही ज्येष्ठ शिवसैनिकांनीही मोहीम सुरु केली होती. मात्र त्यावेळी ठाकरे बंधूनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता.
‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका https://t.co/eIzIOC9qeJ @rautsanjay61 @RajThackeray @mnsadhikrut #Saamana #ThackerayBrand @PawarSpeaks @akshaykumar @BJP4Maharashtra #KanganaRanaut
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 मध्ये राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले. त्यांचा दौरा कोल्हापूरातून सुरु झाला. त्याकाळात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंपुढे टाळीसाठी हात पुढे करण्याची भूमिका मांडली होती. यानंतर राज ठाकरेंनी भर सभेत या टाळी देण्याच्या प्रकाराची खिल्ली उडवली होती. तसेच एकत्र येण्याची भूमिका पेपरला दिलेल्या मुलाखतीत मांडली जात नसते, असं खडसावलं होतं.
2014 मध्ये भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दूरध्वनी केला होता. राज ठाकरे यांची प्रकृती बरी नव्हती. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रस्तावही मांडला होता. याला राज ठाकरेंनीही सहमती दिली होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची बोलणी करण्यासाठी लगेचच एक बैठकही झाली. पण नंतर उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात माघार घेतली.
2017 मध्ये झालेली महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेना युती पुन्हा तुटली. त्यावेळीही शिवसेना-मनसे एकत्र येण्याची जोरदार चर्चा होती. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना संपर्क साधण्यासाठी 7 वेळा दूरध्वनी आणि मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरेंनी एकही फोन घेतला नाही. राज ठाकरेंनी त्यावेळी हा अनुभव प्रचारसभेच्या जाहीर भाषणात सांगितला होता.
संबंधित बातम्या :
‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल, संजय राऊतांची ‘रोखठोक’ भूमिका
जितेंद्र आव्हाडांकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर
Kangana Ranaut | कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार
संबंधित व्हिडीओ :
History of Shivsena MNS reunion efforts