MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी तो थेट ‘न्यूयॉर्क’वरुन परतला! भल्या पहाटे कोण दाखल झालं मुंबईत?

Legislative Council Elections : तो आला अन् मविआला दिलासा मिळाला...

MLC Election 2022 : विधान परिषदेसाठी तो थेट 'न्यूयॉर्क'वरुन परतला! भल्या पहाटे कोण दाखल झालं मुंबईत?
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 12:15 PM

मुंबई : आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक (Legislative Council Election) पार पडतीये. मतांची जुळवाजुळव करताना राजकीय पक्ष कोणतीच कसर सोडत नाहीत. अश्यात मतदानासाठी एक आमदार थेट न्युयॉर्कवरून (New York) परतला आहे. भल्या पहाटे विमान लॅन्ड झालं. अन् महाविकास आघाडीचला हायसं वाटलं. कारण बहुजन विकास आघाडी मविआला मतदान करेन,असं बोललं जात आहे. अश्यात या आमदाराच्या परतण्याने मविआला दिलासा मिळाला आहे.

‘न्युयॉर्क रिटर्न’ आमदार

हे ‘न्युयॉर्क रिटर्न’ आमदार आहेत, क्षितीज ठाकूर. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे हे पुत्र आहेत. ते परदेशात असल्याने विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. मात्र अखेर ते मुंबईत परतले आहेत. मतदानाच्या दिवशी आमदार क्षितीज ठाकूर मुंबईत परतले आहेत. त्यामुळे ते आज मतदानाला उपस्थित राहणार आहेत. हा मविआसाठी मोठा दिलासा आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं मिळावीत यासाठी मविआ प्रयत्नशील आहे. एकनाथ खडसेंसह इतर नेत्यांनी त्यांची भेट घेत मतदान करण्याचं आवाहन केलं. ठाकूर कुटुंबाची जवळची नातेवाईक आजारी असल्याने ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यामुळे मतदानाला ते उपस्थित नसतील अशी चर्चा होती. पण आज ते आज मुंबईत परतले आहेत. पण जरी मविआ बविआची मतं आपल्या पारड्यात पाडण्यासाठी प्रयत्नशील असली तरी त्यांची ही तीन मतं कुणाला दिली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे.

हे सुद्धा वाचा

राजकीय भविष्याची परीक्षा, कुणाची बाजी?

सर्वच राजकीय पक्षांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. कारण राज्यसभा निवडणुकीमनंतर आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. अश्यात कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्रासह देशाच्या नजरा आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.