जलयुक्त शिवाराचा फक्त बोलबाला; अनिल देशमुखांचा भाजपला खोचक टोला

एसआयटीमार्फत चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. (Anil Deshmukh on SIT Probe Jalyukt Shivar Scheme) 

जलयुक्त शिवाराचा फक्त बोलबाला; अनिल देशमुखांचा भाजपला खोचक टोला
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 1:33 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेचा फक्त बोलबाला करण्यात आला. त्या योजनेवर जलयुक्त शिवारावर कँगने ताशेरे ओढले होते. त्याची  एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Anil Deshmukh on SIT Probe Jalyukt Shivar Scheme)

पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्रात राबवली होती. त्याला फार प्रसिद्धी देण्यात आली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातील पाणी टंचाई, पाण्याची पातळी उंचवण्यासाठी त्याचा फायदा होईल, असे सर्व जनतेला वाटलं होतं. पण या योजनेचा फक्त बोलबाला करण्यात आला, अशी टीका अनिल देशमुखांनी केली.

पण जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने चौकशी केली होती. त्या चौकशी अहवालात ही योजना बरोबर राबवण्यात आली नाही असे नमूद करण्यात आलं आहे. या योजनेचा कोणताही फायदा झाला नाही. विदर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही अनिल देशमुखांनी स्पष्ट केले.

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे.

फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली. ही योजना फडणवीसांची सर्वात महत्त्वकांक्षी योजना असल्याचं बोललं गेलं. मात्र, आता या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘द युनिक फाऊंडेशन’च्या अहवालात केला होता. (Anil Deshmukh on SIT Probe Jalyukt Shivar Scheme)

संबंधित बातम्या : 

Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.