संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर केल्याचं वळसे पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलंय.

संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि खासदार संभाजीराजे छत्रपती
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 9:00 PM

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं होतं. त्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर केल्याचं वळसे पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलंय. ( Dilip Walse Patil’s explanation on the allegation of spying for MP Sambhaji Raje)

संभाजीराजे छत्रपतींचा आरोप काय?

आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केलाय. राज्याचा इंटेलिजन्स विभाग पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याबाबत संभाजीराजे यांच्या ट्वीटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून संभाजीराजे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचं संशय व्यक्त केला जातोय.

वळसे-पाटलांचं स्पष्टीकरण

संभाजीराजे यांनी हेरगिरीचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्याबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे. ‘छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे’, असं ट्वीट वळसे-पाटील यांनी केलंय.

संभाजीराजे यांनीही विषय संपवला

दरम्यान, संभाजीराजे यांनी हेरगिरीचा आरोप केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. तशी माहिती संभाजीराजे यांनीच ट्विटरद्वारे दिली आहे. “आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकी चे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे”, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या : 

Breaking : ‘सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय, माझी हेरगिरी करुन काय साध्य होणार?’ खासदार संभाजीराजेंचा सवाल

Sambhajiraje Chhatrapati : “6 जूनपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार”

Dilip Walse Patil’s explanation on the allegation of spying for MP Sambhaji Raje

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.