Dilip Walse Patil: मुख्यमंत्री, काँग्रेस, राऊत, तुमच्यावर नाराज आहे का? आघाडीत पेटलेल्या 5 वादांवर वळसे पाटलांनी मौन सोडलं

चर्चेदरम्यान गृहखात्याला अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केलीय.

Dilip Walse Patil: मुख्यमंत्री, काँग्रेस, राऊत, तुमच्यावर नाराज आहे का? आघाडीत पेटलेल्या 5 वादांवर वळसे पाटलांनी मौन सोडलं
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 5:20 PM

मुंबई : राज्यात गृहखात्याच्या कारभारावरुन शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफुस सुरु असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत गृहखातं उदासिन असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर नाराज असल्याचीही चर्चा सुरु आहेत. या बेबनावाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान गृहखात्याला अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील उत्तम काम करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केलीय.

मुख्यमंत्री आणि वळसे-पाटलांची भेट

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतर वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्र्यांना नेहमीच भेटत असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री आणि माझी भेट शासकीय आणि विभागीय कामांसाठी होत असते. आजची भेटही तशीच असल्याचं वळसे-पाटील म्हणाले.

‘मुख्यमंत्र्यांनाच विचारा’

शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वत:कडे घ्यावं, असा सल्ला दिलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रीपद स्वत:कडे ठेवलं होतं. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. त्याबाबत वळसे पाटील यांनाच विचारलं असता, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलं तर बरं होईल, असं वळसे पाटील म्हणालेत.

‘मुख्यमंत्री गृहखात्याबाबत अजिबात नाराज नाहीत’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कारभारावरुन नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. वळसे-पाटील यांना याबाबत विचारलं असता, मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला आहे. मुख्यमंत्री गृहखात्याबाबत अजिबात नाराज नाहीत. संजय राऊत यांची भावना बरोबर आहे. आमच्या विभागाकडून कमतरता होत असेल तर सुधारणा होईल, असं वळसे पाटील म्हणाले.

‘..तर कारवाई करताना आम्ही मागेपुढे पाहत नाही’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबतही विचारलं असता भाजपबाबत भूमिका सॉफ्ट की हार्ड हे मला कळत नाही. कारवाई केली तर ती न्यायालयात टिकायला हवी. चूक असेल तर कारवाई करताना आम्ही मागेपुढे पाहत नाही, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या : 

NCP Shivsena BJP: फडणवीसांसह भाजपबद्दल अजित पवार, वळसे पाटील तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सॉप्ट कॉर्नर? 5 नेत्यांचे 5 वक्तव्य पाहा

Shivsena NCP: राऊत म्हणतात, गृहखात्याने अधिक सक्षम व्हावं, मुख्यमंत्री म्हणाले, दिलीप वळसे-पाटील उत्तम काम करताहेत

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.