AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड जिल्ह्याचा विकास निधी बारामतीला गेलाच कसा?; खासदार प्रीतम मुंडे यांचा सवाल

राज्य सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो? असा सवाल बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

बीड जिल्ह्याचा विकास निधी बारामतीला गेलाच कसा?; खासदार प्रीतम मुंडे यांचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:16 PM

बीड : सध्या राज्य सरकारकडे कोणत्याही घटकासाठी निधी नाही अशी ओरड होत आहे. राज्य सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो? असा सवाल बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला आहे. हे करत असताना त्यांनी बीड जिल्ह्याचा निधी बारामतीच्या विकासासाठी पळवल्याचा आरोपही केला आहे. (How Beed district’s development Fund shifted to Baramati : Pritam Munde)

प्रीतम मुंडे म्हणाल्या की, “सध्या राज्य सरकारकडे कोणत्याही घटकासाठी निधी नाही अशी ओरड होत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांच्या मदतीसाठीदेखील राज्य सरकारकडे पैसे नाहीत. एवढंच नाही तर कोरोना महामारीशी लढण्यासाठीदेखील सरकारकडे निधी नाही. केंद्राने दिलेल्या निधीवरच लोकांवर उपचार केले जात आहेत. सरकारकडे निधीच नाही तर मग बीड जिल्ह्यातील विकासकामांसाठी आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी बारामतीला कसा काय वर्ग होतो?”

महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात आज बीडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. खासदार प्रीतम मुंडेंच्या उपस्थितीत बीडच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर हे आंदोलन करण्यात आले. याच वेळी उमेदच्या महिला कर्मचाऱ्यांनीही आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रीतम मुंडे यांनीच केले. प्रीतम मुंडे यांच्यासह महिलांनी तब्बल दोन तास जिल्हाधिकारी काचेरीसमोर ठिय्या मांडला होता. यावेळी आंदोलक आणि भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

पीडित महिलेचा प्रीतम मुंडेंसमोर आक्रोश

या आंदोलनावेळी प्रीतम मुंडे लोकांशी बोलत असताना एक पीडित महिला प्रीतम मुंडेंजवळ आली. थेट माईक हातात घेऊन तिने तिची आपबिती सर्वांपुढे मांडली. बोलत असताना पीडित महिलेने अक्षरशः हंबरडा फोडला. यावेळी खासदा मुंडे यांनी सदर महिलेचं सांत्वन करुन तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या

Exclusive | विधिमंडळ किंवा संसदीय राजकारणात कधी? अमित ठाकरे यांचं उत्तर…

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, सरकार मात्र बदल्या करण्यात खुश : रामदास तडस

(How Beed district’s development Fund shifted to Baramati : Pritam Munde)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.