Rajya Sabha : मोठी बातमी, भाजपाचा फायदा, राज्यसभेत 10 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
Rajya Sabha : राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. त्याचा फायदा भाजपाला होणार आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान होणार होतं. मागच्या 10 वर्षात राज्यसभेत पहिल्यांदाच असं घडलं, ज्याचा फायदा भाजपाला होणार आहे.
राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA ला 11 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. भाजपाच राज्यसभेतील स्थान अधिक मजबूत झालय. त्यांच्या आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. इतिहासात पहिल्यांदा NDA राज्यसभेत आत्मनिर्भर झालीय. त्यामुळे मोदी सरकाला विधेयकं मंजूर करुन घेताना फार अडचणी येणार नाहीत. NDA बहुमताजवळ कसा पोहोचला? ते समजून घेऊया. राज्यसभेच्या 12 जागांमध्ये भाजपाचे 9 आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या 2 सदस्यांची बिनविरोध निवड झाली. काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवी तेलंगणमधून राज्यसभेची निवडणूक जिंकले. राजस्थानमधून भाजपाचे रवनीत सिंह बिट्टू, हरियाणामधून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन आणि बिहारमधून मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड झाली. बिहारमधून एनडीएचा भाग असलेल्या राष्ट्रीय लोक पार्टीचे नेते उपेंद्र कुशवाहा विजयी झाले.
निवडणूक आयोगाने राज्यसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली होती. पोटनिवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला मतदान होणार होतं. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट होती. अर्ज मागे घेण्यासाठी 27 ऑगस्टपर्यंत वेळ होता. निवडणूक होण्याआधीच सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेच संख्याबळ 245 आहे. यात आठ जागा रिकामी आहेत. यात जम्मू-काश्मीरच्या चार जागा आहेत. सध्या सदनाच संख्याबळ 237 आहे.
राज्यसभेत बहुमताचा आकडा काय?
राज्यसभेत भाजपाचे 9 उमेदवार जिंकल्यानंतर सभागृहात त्यांची संख्या 96 पर्यंत पोहोचली आहे. सहकारी घटक पक्षांचे 16 खासदार आहेत. राज्यसभेत एनडीएची संख्या 112 झाली आहे. अजूनही त्यांनी पूर्णपणे बहुमताचा आकडा गाठलेला नाही. पण 6 मनोनीत आणि एका अपक्षाच्या समर्थनाने बहुमताचा आकडा गाठला आहे. बुहमताचा आकडा गाठण्यासाठी 119 सदस्यांची आवश्यकता आहे. आता NDA ला कोणतही विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी बीजेडी, YSR काँग्रेस, बीआरएस आणि AIADMK वर अवलंबून रहावं लागणार नाही. जेडी(यू), एनसीपी, जेडी(एस), आरपीआय(ए), शिवसेना, आरएलडी, आरएलएम, एनपीपी, पीएमके, तमिल मनीला काँग्रेस आणि यूपीपीएल हे पक्ष NDA सोबत आहेत.