Narendra Modi | ‘काँग्रेसला 100 वर्ष सत्तेतच यायचं नाही, असं वाटतंय’ मोदींच्या टीकेमागचं लॉजिक काय?

PM Modi Speech in Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'काँग्रेसला 100 वर्ष सतेतच यायचं नाही, असं वाटतंय' असं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य करुनच मोदी थांबले नाहीत. तर काँग्रेसमधील निवडणुकाचं प्रगतीपुस्तकही त्यांनी वाचून दाखवलंय.

Narendra Modi | 'काँग्रेसला 100 वर्ष सत्तेतच यायचं नाही, असं वाटतंय' मोदींच्या टीकेमागचं लॉजिक काय?
मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 6:52 PM

नवी दिल्ली : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) भाजपच्या कामाचा पाढा तर वाचतातच. पण काँग्रेसवरही टीका करायलाही ते विसरत नाहीत. धन्यवाद प्रस्ताव सादर करताना मोदींनी केलेली वक्तव्य म्हणूनच चर्चेत आली आहे. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट निवडणुकांमधील (5 State assembly Elections 2022) जय-पराजयाचा पाढा वाचून काढल्यामुळे जुना राजकीय संघर्ष नव्यानं पाहायला मिळण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसला 100 वर्ष सतेतच यायचं नाही, असं वाटतंय’ असं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य करुनच मोदी थांबले नाहीत. तर काँग्रेसमधील (Congress) निवडणुकाचं प्रगतीपुस्तकही त्यांनी वाचून दाखवलंय. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्षपणे मोदींनी काँग्रेसचे डोळे आकडेवारी सांगत खाडकन उघडण्याचा प्रयत्न आपल्या धन्यवाद प्रस्तावाच्या माध्यमातून केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं तर सांगितलीच, शिवाय पुढच्या शंभर वर्षात काँग्रेसला सत्तेत येण्याचीच इच्छाच नाहीये की काय, अशी शंकाही घेतली.

वक्तव्यामागचं लॉजिक?

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवासह मणिपुरात निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. अशावेळी लोकसभेची संबोधनाच्या माध्यमातून देशभरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मोदींनी आपल्या भाषणातून केला नसेल, अशी शक्यता कमीच आहेत. आधीच कोरोनामुळे प्रचारसभा आणि इतर गोष्टींवर बंधनं आलेली असताना मोदींनी आपल्या धन्यवाद प्रस्तावात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

निवडणुकांपूर्वी थेट आव्हान

लोकसभेत मोदींनी काँग्रेसच्या निवडणुकांमधील कामगिरीची आकडेवारीच सादर केली. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार नागालँडच्या लोकांनी 1988मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं. त्याला आता 24 वर्ष लोटलीत. ओडिसाने 1995मध्ये काँग्रेसला मत दिलं. त्यालाही 27 वर्ष उलटली. अजूनही ओडिसात काँग्रेसची एन्ट्री झाली नाही. गोव्यात 1994मध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं होतं. 28 वर्ष झाली गोव्याने काँग्रेसला पुन्हा स्वीकारलं नाही. 1988 त्रिपुराने काँग्रेसला मत दिलं होतं. ही गोष्ट आहे 34 वर्षापूर्वी. अजूनही तिथे काँग्रेस सत्तेत नाही.

यूपी, बिहार आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे हाल आहेत. म्हणजे शेवटी 1995मध्ये 37 वर्षापूर्वी मतदान काँग्रेसला लोकांनी केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये 1972मध्ये म्हणजे 50 वर्षापूर्वी मतदान काँग्रेसला केलं होतं. तामिळनाडूच्या लोकांनी 1962 म्हणजे 60 वर्षापूर्वी संधी काँग्रेसला दिली होती. तेलंगणा बनविण्याचं श्रेय घेता पण त्यांनीही काँग्रेसला पुन्हा संधी दिली नाही, असा दावा मोदींनी केलाय. शिवाय झारखंडचा जन्म होऊन 20 वर्ष झाली. त्यांनीही पूर्णपणे काँग्रेसला स्वीकारलेलं नाही, असाही टोला मोदींनी लगावलाय. एकूणच काय तर पुढचे शंभर वर्ष काँग्रेसला सत्तेत यायचं नाही, असं वाटतंय, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला थेट आव्हान दिलंय.

संबंदित बातम्या :

Modi | ‘आपका प्यार अजरामर रहे’ असं मोदींनी म्हटलं आणि एकच हशा पिकला! नेमकं घडलं काय?

इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे, मोदींचा शेरो शायरीतून काँग्रेसवर घणाघाती हल्ला

काँग्रेसचा पराभव का झाला? धन्यवाद प्रस्तावात नरेंद्र मोदींनीच सांगून टाकलं कारण! वाचा काय म्हणाले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.