VIDEO: पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो; गुलाबराव पाटलांनी उठवलं चर्चेचं मोहोळ

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. (i was first who offer pankaja munde to join shiv sena, says gulabrao patil)

VIDEO: पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर देणारा मीच होतो; गुलाबराव पाटलांनी उठवलं चर्चेचं मोहोळ
gulabrao patil
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 4:12 PM

जळगाव: भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. ही मागणी होत असतानाच शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर देणारा पहिला मीच होतो, असं विधान गुलाबराव पाटील यांनी करून चर्चेचं माहोळ उठवून दिलं आहे. (i was first who offer pankaja munde to join shiv sena, says gulabrao patil)

गुलाबराव पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं आहे. मुंडे परिवाराचे काम आभाळा ऐवढे मोठे आहे. यामुळे त्‍यांच्‍या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागत राहील. त्‍यांना शिवसेनेत स्‍थान व सन्‍मान मिळेल; असं पाटील यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांचा भाजपमध्ये छळ होत असल्याने त्यांनी शिवसेनेत यावं म्हणून सर्वात पहिली मी त्यांना ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करतानाच पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे हे मुख्‍यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

त्यांचं स्वागतच होईल

पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षात सन्मान मिळत नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याची पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी सर्व प्रथम आपणच त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना पक्षात योग्य ती सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण

भाजपच्‍या नेत्‍या पंकजा मुंडे यांच्‍या समर्थकांनी त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी मागणी केली आहे. तसा सोशल मीडिया वॉर देखील समर्थकांकडून चालविला जात आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्‍हणाले की, विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडत्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिटेही दिली नाहीत. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे कुठेतरी खच्‍चीकरण केले जात आहे.

राणेंचं डोकं फिरलंय

यावेळी त्यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. पूरपरिस्थती तसेच राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही. परंतु, नारायण राणे यांची सरकारवर टीका म्हणजे डोकं फिरलया सारखी परिस्थिती आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावल. राज्यावर संकट आले असताना मानवता या धर्मातून केवळ मदत हाच विषय आला पाहिजे. त्यात कोणतेही राजकारण कुणीही करू नये, असंही ते म्हणाले. (i was first who offer pankaja munde to join shiv sena, says gulabrao patil)

संबंधित बातम्या:

पूरग्रस्तांचं कर्ज माफ करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांचे 50 हजार रुपये तातडीने द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव म्हणाले, मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, फडणवीस म्हणतात, पॅकेज म्हणा किंवा काहीही, पण पूरग्रस्तांना मदत करा

(i was first who offer pankaja munde to join shiv sena, says gulabrao patil)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.