Suhas Kande : हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का?; सुहास कांदे विचारणार आदित्य ठाकरेंना जाब
Suhas Kande : शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्रा आज मनमाडमध्ये येणार आहे. यावेळी शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पाच हजार कार्यकर्ते असणार आहेत.
नाशिक: शिवसेना (shivsena) नेत्यांकडून बंडखोर आमदारांना सातत्याने गद्दार म्हणून डिवचले जात आहे. त्यामुळे बंडखोर आमदारही आता आक्रमक झाले आहेत. या बंडखोर आमदारांनीही आता थेट शिवसेना नेत्यांना सवाल करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार सुहास कांदेही आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना सवाल करणार आहेत. आदित्य ठाकरे आज मनमाडमध्ये येणार आहेत. यावेळी सुहास कांदे पाच हजार कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरेंची (aaditya thackeray) भेट घेणार आहेत. हिंदुत्वासाठी लढलो यात माझी काय चूक झाली? असा सवाल सुहास कांदे (suhas kande) आदित्य ठाकरे यांना करणार आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरूनही ते आदित्य ठाकरेंना काही सवाल करणार आहेत. आपल्या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिल्यास राजीनामा लढवून निवडणूक लढवू, असं आव्हानच कांदे यांनी आदित्य यांना दिलं आहे. त्यामुळे कांदे-आदित्य ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्रा आज मनमाडमध्ये येणार आहे. यावेळी शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पाच हजार कार्यकर्ते असणार आहेत. मी हिंदु्त्वासाठी लढलो. ही माझी चूक झाली का? आम्ही शिवसेना सोडलीच नाही. कोणत्याही पक्षात गेलो नाही. वेगळ्या नावाने गटही स्थापन केला नाही. शिवसेनेवर दावा केला नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे आम्हाला तुम्ही गद्दार कसे म्हणता? असा सवालही कांदे आदित्य ठाकरे यांना विचारणार आहेत.
दाऊदशी संबंधितांसोबत बसायचं का?
एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली. तरीही त्यांना झेडप्लस सुरक्षा दिली नाही. गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं शिंदेंना सुरक्षा देऊ नका. हा काय प्रकार आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध अस्लम शेख आणि नवाब मलिक यांनी विरोध केला होता. त्यांच्या मांडिला मांडू लावून बसायचं का? रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. त्यात दाऊदचा हात असल्याचं उघड झालं. त्या दाऊदच्या सोबत नवाब मलिक यांचं कनेक्शन असल्याचं उघड झालं. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं का? ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली. त्यांना टी बाळू म्हणून हिणवले. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं का?, असा सवाल आदित्य यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
तोंड दाबून बुक्क्याचा मार होता
काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटलं. त्यांच्याविरोधात आम्ही बोलू शकत नव्हतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. अशा काँग्रेसच्याही मांडिला मांडी लावून बसायचं का? माझ्या मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी पर्यटन खात्याकडे 100 कोटी मागितले. ते दिले नाही. पण माझ्या बाजूच्याच मतदारसंघात येवल्यात 200 कोटी रुपये दिले. तरीही काँग्रेससोबत राहायचे का? माझ्या मतदारसंघातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडेही ठाकरे सरकारने लक्ष दिलं नाही. काम होत नव्हती. त्यावर काय उत्तर देणार आहात? असा सवालही आदित्य यांना करणार आहे. त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच त्यांनी दिलं.