Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गांधीजींबद्दल वादग्रस्त ट्वीट : निधी चौधरींवर कडक कारवाई करा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालिका उपायुक्त निधी चौधरींवर तात्काळ कारवाई करा; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य मुंबई […]

गांधीजींबद्दल वादग्रस्त ट्वीट : निधी चौधरींवर कडक कारवाई करा, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Jun 02, 2019 | 11:44 PM

मुंबई : महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पालिका उपायुक्त निधी चौधरींवर तात्काळ कारवाई करा; अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला पाहिजे, असं वादग्रस्त वक्तव्य मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी केलं होतं. निधी चौधरी या महिला IAS अधिकारी आहेत.

“गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे 30. 01.1948 साठी.’ असं ट्वीट निधी चौधरी यांनी केलं होतं.

विशेष म्हणजे  निधी यांच्या ट्वीटच्या शेवटी  नथूराम गोडसेंनी 30 जानेवारी 1948 रोजी गांधी हत्या केल्याबद्दल आभार मानले होते. त्यामुळे यावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या ट्वीटनंतर अनेकांनी निधी यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ट्वीटचा कडाडून विरोध केला होता. तसेच निधी यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली होती. “गांधीजींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने आम्ही निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी करतो. त्यांनी गांधींचा हत्यारा नथूराम गोडसेचे आभार मानले आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही.” असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

काय म्हटलं पत्रामध्ये ? 

दरम्यान यानंतर “शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे हे लांछनास्पद आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी सक्त कारवाई करावी,” असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याबाबत पत्र लिहीले आहे.

त्याशिवाय महाराष्ट्रातील पुरोगामी राज्यात महापुरुषांच्या बाबतीत शासन अधिकाऱ्यांकडून गंभीर अपमान केला जात आहे आणि त्याकडे राज्य शासन कानाडोळा करत असल्याची टीकाही शरद पवारांनी केली आहे.

दरम्यान “या प्रकरणी महाराष्ट्राचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, जेणेकरुन पुन्हा असा प्रकार घडणार नाही,” असे शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

“गांधींना नोटेवरुन काढा आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवा”

'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.