माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. (Devendra fadanvis)

माझ्या हातात सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : फडणवीस
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 2:49 PM

नागपूरओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सरकारविरोधात आज रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. (If you give me power I will get reservation for OBC again, otherwise I will retire from politics Says Devendra fadanvis)

…नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन

पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. नागपूरमधल्या आंदोलनात फडणवीसांना ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. खास करुन त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले.

काँग्रेसशासित राज्यात आरक्षण मग महाराष्ट्रात का नाही?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. आम्ही काढलेला अध्यादेश या सरकारनं लॅप्स केला. महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुडदा पाडला. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग, केवळ महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण का रद्द झालं, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?

“ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण… तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या… ओबीसी आरक्षणाची जी पिटीशन झाली, ज्या पिटीशनमुळे हा निकाल आला, ही पिटिशन दोन जणांनी दाखल केली होती. पहिला व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरा व्यक्ती भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष…, असं म्हणत काँग्रेस ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी आहे”, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

…नाहीतर सरकारला खुर्ची खाली करावी लागेल

आम्ही आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न केले. 50 टक्क्यांच्यावरचं आरक्षण सुद्धा आम्ही वाचवलं आहे. मात्र या सरकारने तो अध्यादेश लॅप्स केला. भाजपचे आज 1500 ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

तुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? , देवेंद्र फडणवीसांचा सवाल

OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’

(If you give me power I will get reservation for OBC again, otherwise I will retire from politics Says Devendra fadanvis)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.