CM Eknath Shinde : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, मुख्यमंत्र्यांनी थेट ललकारले, आत्मविश्वासालाच डिवचल्याने शिंदे आक्रमक..

CM Eknath Shinde : ज्योतिषाला भेटल्यावरुन राज्यात गोंधळ सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी सरकार पाडून दाखविण्याचे थेट आव्हान विरोधकांना दिले.

CM Eknath Shinde : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, मुख्यमंत्र्यांनी थेट ललकारले, आत्मविश्वासालाच डिवचल्याने शिंदे आक्रमक..
विरोधकांना आव्हानImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 25, 2022 | 6:15 PM

सातारा : सातत्याने हल्ले सुरु असल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही शड्डू ठोकले आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे त्यांनी विरोधकांना (Opposition) ललकारले. विरोधकांना थेट सरकार पाडण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विरोधकांनी दोन दिवसांपासून सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढविला होता. विरोधकांच्या जोर बैठका वाढल्याने त्याविरोधात मुख्यमंत्र्यांनी जोरदार आघाडी उघडली.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकारणावर ज्योतिषशास्त्राने कुरघोडी केली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांसह पुन्हा गुवाहाटीचा दौरा काढल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले.

आत्मविश्वास कमी असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला आणि कर्मकांडाला महत्व देत असल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला. हे सरकार मंत्र-तंत्रावर तगल्याचा आरोप होत असताना मुख्यमंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठं-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन कीर्तिकर, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ असे ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचे सांगत, त्यांनी ठाकरे गटाला आत्मपरिक्षण करण्याचे, आत्मचिंतन करण्याचा सल्ला ही दिला.

सीमाप्रश्नावरुन वातावरण तापलेले असताना हा प्रश्न धसास लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमाप्रश्नावर राज्य सरकार स्वस्थ बसणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

राज्यात प्रत्येक कॅबिनेटमध्ये एक दोन जलसिंचन योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. निर्णय घ्यायाला हिंमत लागते, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच भूंकपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडविल्याचा दावा त्यांनी केला. आतापर्यंत एक-दोन पिढ्यांना लाभ मिळत होता. आपल्या सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या पुढच्याही पिढ्यांना लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.