Imtiaz Jaleel : ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं’, नामांतरावरुन खासदार इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. या निर्णयावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जलील यांनी थेट इशारा दिलाय.

Imtiaz Jaleel : 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं', नामांतरावरुन खासदार इम्तियाज जलील यांचा थेट इशारा
इम्तियाज जलील, खासदार, एमआयएमImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:11 PM

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अखेरच्या घटना मोजत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. औरंगाबादचं (Aurangabad) नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याची मागणी शिवसेनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. मात्र, अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातही त्यावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, आता महाविकास आघाडी सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी औरंगाबाद आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर करण्याचा निर्णय आज घेण्यात आलाय. या निर्णयावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जलील यांनी थेट इशारा दिलाय.

इम्तियाज जलील यांचा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा

काँग्रेसचे कुणीही लोक दिसले तर त्यांच्या फोटोंवर जोड्यांची माळ घाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावं, पाहा आम्ही तुमचं कसं स्वागत करतो, असा इशाराच जलील यांनी दिलाय. तसंच हा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर राजीनामे फेकायला पाहिजे होते. चंद्रकांत खैरे यांनी आता फक्त नाचत राहिलं पाहिजे. कारण त्यांच्यासाठी आता फक्त तेवढंच काम शिल्लक राहिलं असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. दरम्यान, नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहनही जलील यांनी केलंय.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करा अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, मागील अडीच वर्षापासून सत्तेत असूनही शिवसेनेकडून याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. मात्र, आता शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिवसेनेनं हे महत्वाचे प्रस्ताव सादर केले. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचाही एक प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला गेला. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काँग्रेस जोरदार विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनी नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं पाहायला मिळालं.

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.