Sanjay Raut : ‘रात्रीस खेळ चाले’, नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली
Sanjay Raut : "छाताडावर मोदी नावाचा जो राक्षक बसला आहे, त्याला खाली ओढण्यासाठी नवनीत राणाचा पराभव केला पाहिजे. मला लोक उगाच मनात नाहीत, सौ दाऊद एक राऊत" अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“जे घाबरले ते पळाले, ते गद्दार झाले. पळपुटेपणा करणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहला जात नाही. आम्ही गुजरात समोर झुकणार नाही, हा विकणारा महाराष्ट्र नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. कधीच हा महाराष्ट्र मोदी, शाहंपुढे गुडघे टेकणार नाही. 56 इंचाची छाती महाराष्ट्रात नाही, तर लडाखमध्ये दाखवा” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटीसाठी आठ-आठ दिवस वेटींगवर ठेवलं जातं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढा लाचार आहे, रोज उठतो आणि दिल्लीला जातो” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“राज्यात मविआचे जागावाटप झालं आहे. अमरावती हे विदर्भाचे नाक आहे. अमरावतीची एक संस्कृती आहे. अमरावतीची प्रतिष्ठा पाच वर्षात महाराष्ट्र आणि दिल्लीत धुळीस मिळाली आहे. छाताडावर मोदी नावाचा जो राक्षक बसला आहे, त्याला खाली ओढण्यासाठी नवनीत राणाचा पराभव केला पाहिजे. मला लोक उगाच मनात नाहीत, सौ दाऊद एक राऊत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
‘भाजपने महाराष्ट्राला नामर्द केलं’
“आम्ही कायदेशीर आणि बेकायदेशीर शस्त्र चालवतो म्हणून शिवसेना टिकून आहे. शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले, पण दोन सोडून गेले पण एक शिवसैनिक जागेवर आहे. भाजपने महाराष्ट्राला नामर्द केलं. देशात हिंदू मुस्लिम दंगली केल्या” अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला. “विकासाचं पोरगं तुम्हाला झालं नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे. तुम्हाला बोलावेल पण तुम्ही जायचं नाही. आपला उमेदवार बलवंत वानखेडे आहे. रात्र वैऱ्याची आहे. रात्रीस खेळ चाले” नवनीत राणांवर टीका करताना राऊत यांनी हे शब्द वापरले.
त्या मंदीरात येऊन अमित शाहा खोटं बोलले
“ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मातोश्री विषयी अपशब्द वापरले, त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे कर्तव्य समजून कामाला लागा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश समजून ताकदीने कामाला लागा. मातोश्री हे आमचं मंदिर आहे. त्या मंदीरात येऊन अमित शाहा खोटं बोलले” अशी टीका संजय राऊत यांनी केली.