मुख्यमंत्र्यांसमोर प्रताप सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला आणि इतरांना संजय राऊत ऑक्सिजन देतात!

आज गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन न करता 'आरोग्य उत्सव' अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसमोर प्रताप सरनाईक म्हणाले, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला आणि इतरांना संजय राऊत ऑक्सिजन देतात!
Pratap sarnaik_CM Uddhav Thackeray
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 2:33 PM

ठाणे : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचे (Oxygen plant) लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झालं. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut), ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.

कोरोनाचे संकट पाहता, दहीहंडी उत्सव गर्दी करून मोठ्या प्रमाणात साजरी न करता त्याऐवजी जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी हा प्लांट उभारण्यात आला आहे. आज गोकुळ अष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन न करता ‘आरोग्य उत्सव’ अंतर्गत हा ऑक्सिजन प्लांट लोकांच्या सेवेसाठी अर्पण केला , असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.

संजय राऊत मला ऑक्सिजन देतात

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मात्र यावेळी प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांना विशेष धन्यवाद दिले. मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

“मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आजपासूनच या प्लँटचं लोकार्पण झाल्यामुळे कार्यरत करत आहोत. परत एकदा या ठिकाणी आलेल्या सर्वांचं आभार. खासकरुन संजय राऊत साहेबांचं आभार, मी सर्वांना ऑक्सिजन देतो, पण मला ऑक्सिजन देण्याचं काम संजय राऊत करतात. आता दुसऱ्यांनाही ते ऑक्सिजन देत आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार” असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांना धन्यवाद दिले.

दहीहंडी साजरी करणाऱ्यांना ऑक्सिजन लागेल, त्यांच्यासाठी हा प्लांट : संजय राऊत

ऑक्सिजन प्लाँटचे हे आदर्श असे काम आपण करत आहे, त्याबद्दल प्रताप सरनाईक यांचं कौतुक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा सण हा दही हंडी, मात्र या सणावर निर्बंध लावले असतानाही काही लोक पालन करत नाहीत. काही राजकीय पक्ष हट्टाने दही हंडी रस्त्यावर साजरा करताना दिसत आहेत. ते स्वतःला कोरोनाच्या निमंत्रण देत आहेत, त्यांना या ऑक्सिजनची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे नाव देशात घेतलं जातं. कोर्टही म्हणतं महाराष्ट्राकडून शिका. यामध्ये असे दिसते की या कोरोनाशी महाराष्ट्र लढू शकतो. हा ऑक्सिजन पुरेसा नाही अजून देखील गरज आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी कोणाचा जीव गेला नाही. एकनाथ शिंदे असतील इतर जण असतील त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले आहे. आपण पुण्य कमावण्याचे काम करत आहे. संकटकाळी हेच पुण्याचे काम कामी येईल, असं संजय राऊत प्रताप सरनाईकांना म्हणाले.

प्रताप सरनाईकांना जास्त निधी दिला : एकनाथ शिंदे

10 ऑगस्ट रोजी असेच उद्घाटन ठाण्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले होते, त्यानंतर प्रताप सरनाईक यांनीदेखील ठरवले आणि आज दही हंडी काळात हा उपक्रम घेतला. कोरोनामध्ये रेमडेसीवर ,ऑक्सिजन आणि खाटांची खूप गरज भासत होती. एकदा अशी देखील वेळ आली होती की पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन संपत आला होता आणि त्यावेळेस कसरत करत ऑक्सिजन पुरवठा केला. आम्ही अनेक निधी या कोरोना काळात दिला त्यामध्ये प्रताप सरनाईक यांना जास्त दिला, असं एकनाथ शिंदे यांनी नमूद करताच मंचावर एकच हशा पिकला.

VIDEO : ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचं उद्घाटन

संबंधित बातम्या 

तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष, राज ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका

‘सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात’, आरोग्य उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.