Tanaji Sawant | उस्मानाबादेत तानाजी सावंतांचे कार्यकर्ते एकवटले, मंत्रीपदासाठी तुळजाईला साकडं, महाआरतीनं दुमदुमलं भवानी माता मंदिर!

डॉ. तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी सह उस्मानाबाद यवतमाळ मतदार संघात कोट्यावधी रुपये खर्च करुन शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली. जवळपास 150 किमी खोलीकरण कामे करुन त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव दिले, या योजनेमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटून हरीतक्रांती झाली.

Tanaji Sawant | उस्मानाबादेत तानाजी सावंतांचे कार्यकर्ते एकवटले, मंत्रीपदासाठी तुळजाईला साकडं, महाआरतीनं दुमदुमलं भवानी माता मंदिर!
मंत्रिमंडळात आ. तानाजी सावंत यांची वर्णी लागावी म्हणून तुळजाभवानी येथे महाआरती करण्यात आली .
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 11:13 PM

उस्मानाबाद : राज्यातील नाट्यमय सत्तातरानंतर (Eknath Shinde) शिंदे गटातील आमदार यांना आता (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. तर त्यांचे समर्थक हे नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी देवीला साकडे घालत आहेत. शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर (Tanaji Sawant) आ. तानाजी सावंत यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यासाठी सावंत समर्थकांनी तुळजाभवानी व धारासूर मार्दीनी मातेची महाआरती करीत देवीला साकडे घातले. मागील मंत्रिमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेक विकास कामे खोळबली होती. कृषी, सिंचन, उद्योगसह अन्य कामे मार्गी लावण्यासाठी सावंत यांचा समावेश मंत्रिमंडळात करावा अशी मागणी करीत साकडे घातले.आई राजा उदो उदो, जय भवानी जय शिवाजी, सावंत व शिवसेनेचा विजय असो अश्या घोषणा दिल्या.

जलसंधारणाच्या कामावर भर

डॉ. तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी सह उस्मानाबाद यवतमाळ मतदार संघात कोट्यावधी रुपये खर्च करुन शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली. जवळपास 150 किमी खोलीकरण कामे करुन त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव दिले, या योजनेमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटून हरीतक्रांती झाली. सामूहिक विवाह सोहळे, शेतकरी कुटुंबातील मुलींचे लग्न लावून कन्यादान, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, शैक्षणिक मदत करीत आधार दिला. अनेक मुलांना शिक्षण व नौकरीची संधी दिली यासह अनेक विकासकामे स्वखर्चाने केली.

म्हणून मंत्रिपदाचा अट्टाहास

सावंत हे शिवसेना भाजप युतीच्या काळात शेवटची 4 महिने जलसंधारण मंत्री व उस्मानाबादचे पालकमंत्री होते त्या काळात पीक कर्ज वाटप प्रमाण वाढले तसेच महिला बचत गट सक्षमीकरण झाले यासह अन्य कामे झाली. आजवर उस्मानाबादला मंत्रिपद मिळालेच नाही शिवाय इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करण्यात आले त्यामुळे हक्काच्या माणसाला मंत्रिपद व पालकमंत्री करावे अशी मागणी सावंत समर्थक सुरज साळुंके यांनी केली.

हे सुद्धा वाचा

तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा,भूम या शहरात सावंत समर्थकांनी बंडखोरीनंतर मोठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले होते. मागील मंत्रिमंडळात सावंत यांना राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून डावलण्यात आले होते. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मतदार संघातील विकास कामे जाणीवपूर्वक अडवत होती. तसेच निधी कपात करणे असे प्रकार करत होते. स्थानिक राष्ट्रवादीचे त्रास देत असल्याच्या व्यथा मांडल्या व सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. सावंत जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण, आम्ही सदैव तुमच्या सोबत असा हुंकार देत हे कार्यकर्ते एकवटले व रस्त्यावर उतरले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.