Jalgaon : भाऊ शिंदे गटात तर बहिण सेनेत, शिवसेना पक्षाचे माहिती नाही पण शिवसेना कार्यालय मात्र बहिणीकडेच..! नेमकी भानगड वाचा सविस्तर
आमदार किशोर पाटील हे आता शिंदे गटात आहेत तर त्यांची बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. एवढेच नाहीतर मध्यंतरी त्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीलाही गेल्या होत्या. आता दोन दिवसांमध्ये आ. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा ही जळगावात दाखल होत आहे. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी यांनी यात्रेची तयारी सुरु केली आहे.
जळगाव : राज्यात सुरु असलेले (Politics) राजकारण आता थेट नात्या-गोत्यापर्यंत येऊन ठेपले आहे. राज्यात (Shiv Sena Party) शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन राजकारण सुरु आहे. तर जळगावात कार्यालय कुणाचे याची चर्चा रंगली आहे, त्याचे कारणही तसेच आहे. (MLA Kishor Patil) आमदार किशोर पाटील हे आता शिंदे गटात तर त्यांची बहिण ही शिवसेना पक्षात आहे. मात्र, दोघांचे कार्यालय आतापर्यंत एकाट ठिकाणी होते. पण भावाने शिंदे गटात प्रवेश केला आणि कार्यालयावरुन मोठी पंचाईत झाली. यातच आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा दोन दिवसांमध्ये जळगावात येत आहे. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी यांनी यात्रेची तयारी सुरु केली आहे. शिवाय कार्यालयाची जागा ही आपल्याच नावे असल्याने त्यांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नावाचे फलक खाली उतरवले आहे. त्यामुळे एकीकडे राजकारण सुरु असले तरी दुसरीकडे पक्षावरील निष्ठा ही आजही कायम आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
येथील आमदार किशोर पाटील हे आता शिंदे गटात आहेत तर त्यांची बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेला पाठिंबा दर्शवला होता. एवढेच नाहीतर मध्यंतरी त्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीलाही गेल्या होत्या. आता दोन दिवसांमध्ये आ. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा ही जळगावात दाखल होत आहे. त्यामुळे वैशाली सूर्यवंशी यांनी यात्रेची तयारी सुरु केली आहे. तर कार्यालय म्हणून त्यांनी पूर्वी असलेल्या कार्यालयावरच आपला हक्का सांगितला आहे. शिवाय कार्यालयाची जागाही त्यांच्याच मालकिची आहे. त्यामुळे भावाने लावलेले शिंदे गटाचे फलक खाली उतरवून शिवतीर्थ शिवसेना कार्यालय असे फलक झळकले आहे.
कार्यालय शिवसेनेचेच
एकीकडे शिवसेना कुणाची यावरुन कोर्टात वाद सुनावणी सुरु आहे. त्यावरुन राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे तर जळगावात विषय गाजला तो शिवसेना कार्यालयाचा. अखेर कार्यालयरील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नावाचे फलक खाली उतरवले गेले असून, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नावाचे फलक लागले आहे. शिवतीर्थ हे कार्यालय आमदारांना खाली करावे लागले आहे. त्यामुळे भविष्यात बहिण-भावातील राजकारण कुठे जाते हे पहावे लागणार आहे.
निष्ठा यात्रा जळगावात
आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा ही बंडखोर आमदारांच्या मतदार संघात काढली जात आहे. 9 ऑगस्ट रोजी ते जळगाव मतदार संघात दाखल होत आहेत. त्यामुळे बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्याबद्दल ते काय बोलणार हे पहावे लागणार आहे. ते एका बंडखोर आमदारांबद्दल बोलणार असले तरी शिवसेनेमध्ये असलेल्या वैशाली सूर्यवंशी यांचे ते भाऊ आहेत हे लक्षात घ्यावे लागणार आहे.