‘त्या’ समितीत राणे, शिंदे आणि राज ठाकरेंचा समावेश करा; नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांना शह देणारी मागणी
भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यावरुन टीका केली आहे. स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधानांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावर ठाकरे यांनी प्रचंड टीका केली होती. त्याबद्दल बोलताना शरद पवारांनाही जाणता राजा अशी उपमा दिली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी टीका का केली नाही ? असा सवालही राणे यांनी केला आहे.
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीत आता नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश करा अशी मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे भाजपाचे नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची झाली आहे. त्यामुळे या समितीतील सदस्यांना बदलायला हवे असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना केवळ बिल्कीस बानो यांची चिंता आहे तेवढी चिंता आमच्या हिंदू भगिनी दिशा सालीयन, स्वप्ना पाटकर यांची नाही का ? असाही सवाल त्यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरु आहे. या स्मारकासाठी सूचना आणि सल्ला देण्यासाठी नेमलेल्या समितीत आता नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे भाजपा नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे सदस्य बदलायला हवेत, कारण शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बिल्कीस बानो यांची चिंता आहे. परंतू त्यांना आमच्या हिंदू भगिनी दिशा सालियन आणि स्वप्ना पाटकर यांची चिंता नाही का ? दिशा सालीयनवर अत्याचार झाला सामूहिक बलात्कार झालेला आहे ते तुम्हाला दिसले नाही का ? तुम्हाला केवळ हिरवं राजकारण करायचे आहे का ? असा सवालही त्यांनी केला.
पोलीस पाटील बनायची लायकी नाही…
काल ओसाड गावचे पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर होते अशा भाषेत त्यांच्यावर नितेश राणे यांनी तोंडसुख घेतले. तोंडावर आपटण्याची उद्धव ठाकरे यांना सवय झाली आहे. सुर्यकांत दळवी यांनी भाजपात प्रवेश केला याचा अर्थ उद्धव ठाकरे किती चपट्या पायाचा माणूस आहेत. त्यांचा पायगुण बघा अशीही टीका त्यांनी केली आहे. तुमच्या घरातील एका व्यक्तीने दिशा सालियनवर अत्याचार केला आहे. सामुहिक बलात्काराचा त्याच्यावर आरोप केला आहे. परंतू त्यावर काही बोलायचं नाही. भाजप, मोदी साहेब, फडणवीस यांच्यावर गरळ ओकण्याशिवाय ते काय करणार ? त्यांनी काल पंतप्रधान बनायचं आहे असा फार मोठा जोक मारला आहे. त्यांची पोलिस पाटील बनायची लायकी नसल्याचे नितेश राणे यांनी टीका करताना म्हटले आहे. पवारांना ‘जाणता राजा’ ही जी उपमा दिली जाते. त्यावर का आक्षेप घेतला नाही, तेव्हा का नाही थोबाड उघडत असेही ते म्हणाले. संजय राऊत यांचा स्वत: चा भाऊ, मुलगी यांची नावं खिचडी घोटाळ्यात आली आहेत. त्यामुळे त्यांनी खालेल्ली खिचडी थोडी पचवावी असेही राणे यांनी टीका करताना म्हटले.