Azadi ka Amrit Mahotsav Live Updates : चंद्रपुरात तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस-भाजप एकत्र रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज एकत्र आल्याने उंचावल्या भुवया

| Updated on: Aug 15, 2022 | 6:26 PM

राज्यासह देशातच नव्हे जगभरात भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुठे काय काय घडतंय, हे जाणून घ्या, एका क्लिकवर

Azadi ka Amrit Mahotsav Live Updates : चंद्रपुरात तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस-भाजप एकत्र रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज एकत्र आल्याने उंचावल्या भुवया

देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुबेच्छा दिल्या आहेत. ट्वीट करत त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. लाल किल्ल्यावरुन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. हे त्यांचं लाल किल्ल्यावरुन केलं जाणारं नववं भाषण असणार आहे. या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जाणून घ्या स्वातंत्र्यदिनाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Aug 2022 04:04 PM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कल्याणच्या दावते इस्लामी हिंद चा एका करोड झाडे लावण्याचा संकल्प

    कल्याण : भारत देश ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना कल्याणच्या मौलवी कंपाऊंड दूध नाका परिसरात ‘दावते इस्लामी हिंद’ संघटने तर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व नागरिकांनी हातात तिरंगा घेवून ‘हिंदुस्तान झिंदाबाद’ ‘आय लव इंडिया,आदी घोषणा देत ही रॅली काढली होती. ही रॅली मुस्लिम मोहल्यात फिरून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सर्व समाजात बंधूभाव वाढवा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी मोलाना मोहम्मद सिराज शेख यांनी सांगितले संपूर्ण भारत देशात १ करोड झाड लावण्याचा संकल्प आम्ही ठेवला आहे.

  • 15 Aug 2022 04:02 PM (IST)

    जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी काढली 75 फूट तिरंगा रॅली

    जळगावच्या चाळीसगाव मध्ये NCC विद्यार्थ्यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातून 75 फूट भव्य तिरंगा रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर देखावे सादर केले. या रॅलीत मोठ्या संख्येने तिरंगा घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते.

  • 15 Aug 2022 03:03 PM (IST)

    परभणीत पक्क्या रस्त्यांसाठी पाण्यात उभा राहून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

    गावाच्या पक्क्या रस्त्यांसाठी पाण्यात उभा राहून ग्रामस्थांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा ,

    परभणीच्या जिंतूर तालुक्यातील चितनरवाडी येथील प्रकार,

    चितनरवाडी-आडगाव बाजार असा दीड किलोमीटर रस्त्यासाठी ग्रामस्थांचा स्वातंत्र्य दिनादिवशीच अनोखे आंदोलन ,

    स्वातंत्र्यादिवशी ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची जिल्ह्यात जोरदार चर्चा.

  • 15 Aug 2022 01:53 PM (IST)

    चंद्रपुरात तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस-भाजप एकत्र रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज एकत्र आल्याने उंचावल्या भुवया

    चंद्रपुरात तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस-भाजप एकत्र,

    भाजप नेते वन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 1500 फूट तिरंगा रॅलीचा प्रारंभ,

    माजी खासदार काँग्रेस नेते नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने आयोजित झाली तिरंगा रॅली,

    शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या रॅलीत मुसळधार पावसात सहभागी झाले विद्यार्थी नागरिक,

    रॅलीच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपचे दोन दिग्गज ध्रुव एकत्र आल्याने उंचावल्या भुवया,

    तिरंगा म्हणजे लाखो शहीदांच्या हौतात्म्याचे गौरवपूर्ण स्मरण असल्याचे मुनगंटीवार यांचे मत

  • 15 Aug 2022 01:40 PM (IST)

    ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी 51 नवीन औषधे यांचा लोकार्पण सोहळा

    ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी 51 नवीन औषधे यांचा लोकार्पण सोहळा

    जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे यांनी भारताच्या 25 व्या स्वातंत्र्यदिनी 51 नवीन औषधे यांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

    या उद्घाटनप्रसंगी आतंरराष्ट्रीय  रेसलर द ग्रेट खली आणि जेष्ठ अभिनेते गुलशन ग्रोवरदेखील उपस्थित

    भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के , आमदार रवीद्र फाटक, सेना खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते..

  • 15 Aug 2022 01:37 PM (IST)

    महिलांचा सन्मान महाराष्ट्रापासून व्हायला पाहिजे, मंत्रिमंडळात एकही महिला नाही; खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची मागणी

    महिला सन्मान महाराष्ट्रापासून व्हायला पाहिजे

    महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही.

    मोदींच्या नारी सन्मान घोषणेचा शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी घेतला समाचार

    महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण मंत्रालय एका पुरूषाकडे

    एकीकडे महिला सन्मानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे सुली बाई बुली होत आहे

    महिलांना 33 टक्के आरक्षण द्या

  • 15 Aug 2022 12:59 PM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुंबई काँग्रेसतर्फे आझादी गौरव यात्रा

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुंबई काँग्रेसतर्फे आझादी गौरव यात्रा

    अंधेरी रेल्वे स्टेशन, अंधेरी पश्चिम येथून “आझादी गौरव यात्रेला” सुरुवात

    महात्मा गांधी प्रतिमा, जुहू चौपाटी येथे समाप्त होणार

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत मुंबई काँग्रेसतर्फे आझादी गौरव यात्रेचे आयोजन

  • 15 Aug 2022 12:46 PM (IST)

    पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळालेः राज्यपाल कोश्यारी

    पंचायत राज प्रणालीमुळे लोकशाही प्रणालीला बळ मिळाले-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    पंचायत राज प्रणालीमुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना अधिक शक्ती देण्याचे कार्य केंद्र सरकारने केले

    गावासाठी असणारा निधी सरळ ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.

    या माध्यमातून लोकशाही प्रणाली अधिक मजबूत होत आहे

  • 15 Aug 2022 12:32 PM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अरब मस्जिद ट्रस्ट आणि मुस्लिम बांधवांच्यावतीने ध्वजारोहण

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अरब मस्जिद ट्रस्ट आणि मुस्लिम बांधवांच्यावतीने ध्वजारोहण

    सरदार वल्लभभाई पटेल चौक येथून रॅली

    मुस्लिम बांधवांच्या हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम्, भारत माता की जय दिल्या घोषणा

    या रॅलीत मुस्लिम बांधवांनसहित सर्व धर्मीय बांधव सहभागी

    या रॅलीमुळे समाजासमोर सामाजिक एकतेचे उदाहरण दिले गेले.

    पूर्ण शहरातून ही रॅली काढली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

    इगतपुरीनगर परिषद येथे राष्ट्रगान करून रॅलीची सांगता

  • 15 Aug 2022 12:15 PM (IST)

    स्वातंत्र्य महोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं;छगन भुजबळ

    – 75 वा स्वतंत्र दिन साजरा होतो याचा आनंद – तिरंगा आपल्या राष्ट्राचे निशाण – तिरंगा साठी लाखो जवान लढतात – स्वातंत्र्य महोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं – स्वातंत्राला 75 वर्ष झाले।असले तरी – टिळक , गांधी, नेहरू, बोस, सावरकर यांनी बलिदान दिले – अनेकांनी काळ्या पाण्याची सजा भोगली – पंडित नेहरू 11 वर्ष जेल मध्ये राहिले – प्रत्येक जण स्वातंत्रासाठी लढले – पुस्तकांमध्ये काही ठिकाणी पंडित नेहरूंचे चित्र छपायचे का नाही याबाबत चर्चा सुरू आहे – त्यांचं बलिदान कसं विसरू शकतो आपण – फक्त एखाद्याच्या चूका दाखवून नाही चालत – कोणी महिला म्हणाल्या की स्वतंत्र भीक मागून मिळालं – काही जण म्हणाले स्वातंत्र्य 2014 ला मिळाला

  • 15 Aug 2022 12:12 PM (IST)

    कामानिमित्त परदेशात गेलेल्या भारतीयांकडूनही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

    कामानिमित्त परदेशात गेलेल्या भारतीयांकडूनही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

    -पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरणमध्ये राहणारा मात्र थायलँडमध्ये काम करणाऱ्या सचिन जोगळेकर या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पॅराशूटच्या साहाय्याने 1300 फूट उंचीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला

  • 15 Aug 2022 12:09 PM (IST)

    स्वातंत्र दिनानिमित्ताने मुंबईच्या टिळकनगर परिसरात मुळ शिवसेनेकडून बॅग आणि पुस्तकांचं वाटप

    स्वातंत्र दिनानिमित्ताने मुंबईच्या टिळकनगर परिसरात मुळ शिवसेनेकडून बॅग आणि पुस्तकांचं वाटप

    झोपडपट्टीतील 1 हजार मुलांना शिवसेनेनं वाटली वह्या पुस्तके आणि बॅग

    – बॅगवर बाळासाहेब ठाकरे , ऊद्धव ठाकरे, अदित्य ठाकरे यांचे फोटो

    – सेना आमदार प्रकाश फातर्पेकर आणि युवा सेना नेते कार्थिक स्वामी यांचा ऊपक्रम

  • 15 Aug 2022 11:37 AM (IST)

    पुण्यातील मुक्ताईनगरात 100 फुट ध्वज तिरंगाचे लोकार्पण

    मुक्ताईनगरात अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शंभर फुट ध्वज तिरंगाचे लोकार्पण

    ध्वजारोहण हजारो नागरिकांच्या व स्वातंत्र्य सैनिक यांच्या उपस्थित

    तालुक्यातील नागरिकांकडून तिरंगाला सलामी

    यावेळी पावसाच्या आगमनात ध्वजाचे स्वागत उत्साहात

  • 15 Aug 2022 11:26 AM (IST)

    नागपुरातील अंबाझरी तलावाच्या मध्यभागी पोहत जाऊन केलं ध्वजारोहण

    नागपुरात स्वातंत्र्यता दिनाचा वेगळा उत्साह

    अंबाझरी तलावाच्या मध्यभागी पोहत जाऊन केलं ध्वजारोहण

    स्वीमर क्लब आणि उत्सुक नागरिकांनी केलं ध्वजारोहण

    जवळपास अडीच किमी यानंतर पोहत जाऊन मध्यभागी केलं ध्वजारोहण

    भारत माता की जय , वंदे मातरमचा जयघोष

    गेल्या अनेक वर्षांपासून केलं जातं या तलावात ध्वजारोहण

  • 15 Aug 2022 11:19 AM (IST)

    खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

    खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

    विविध क्षेत्रातील 75 मान्यवरांचा केला सत्कार

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून ध्वजारोहण

    शहरातील रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या 100 फूट उंच तिरंगा ध्वजला यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मानवंदना दिली.

    विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 75 जणांचा सन्मानपत्र देऊन गौरव

    राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे देखील उपस्थित होते

  • 15 Aug 2022 10:55 AM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त डहाणूतील पारनाकामध्ये मध्यप्रदेशातील ब्रास बेंडच्या तालावर प्रभात फेरी

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त डहाणूतील पारनाका येथे प्रांताधिकारी असीमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

    नगरपरिषद डहाणू येथून विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती

    मध्यप्रदेशातील प्रसिद्ध ब्रास बेंड तालावर प्रभात फेरी

    प्रभात फेरी दरम्यान आदिवासी तराफा नृत्य, लेझीम अश्या कार्यक्रमाचे आयोजन

    तिरंगी झेंडामूळ संपूर्ण परिसर तिरंगी रंगात रंगलेला दिसून येत होता.

  • 15 Aug 2022 10:41 AM (IST)

    अहमदनगरमध्ये महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

    अहमदनगरमध्ये महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

    पोलिस परेड ग्राऊंडवर पार पडला कार्यक्रम

    खातेवाटपात कोणीही नाराज नाही

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी त्याबाबद स्पष्ट केलं आहे

    सगळे मंत्री समाधानी आहेत

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघही समर्थ आहेत

  • 15 Aug 2022 10:31 AM (IST)

    छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर साजरा केला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

    छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडवर साजरा केला भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव

    नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजास दिली सलामी

    फेसबुकवर शेअर केला अनुभव

    आपल्या पोस्ट मधून छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, अगणित वीरांच्या बलिदानातून 1947 देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते.

  • 15 Aug 2022 08:53 AM (IST)

    राजकीय क्षेत्रातील कौटुंबिक वारशामुळे राजकीय क्षेत्राचे नुकसान

    राजकीय क्षेत्रातील कौटुंबिक वारशामुळे राजकीय क्षेत्राचे नुकसान

    घराणेशाहीमुळे देशाचे नुकसान

  • 15 Aug 2022 08:48 AM (IST)

    आज 75 वर्षांनंतर मेड इन इंडियाला सलामी

    जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंध

    जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान.

    देशाची 5G च्या दिशेने वाटचाल

    आज 75 वर्षांनंतर मेड इन इंडियाला सलामी

    डिजिटल क्रांतीमुळे एक नवीन जग निर्माण झालं

    आज जग सर्वसमावेशक आरोग्यसेवेबद्दल बोलत आहे.

  • 15 Aug 2022 08:45 AM (IST)

    देशातील अनेक राज्यांनी देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं

    कार्यक्रम वेगळे असले तरी राष्ट्राच्या स्वप्नांसाठी एकत्र या

    भारताच्या विकासाला मार्ग दाखवा

    देशातील अनेक राज्यांनी देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं

    सहकारी तत्वांची गरज

  • 15 Aug 2022 08:43 AM (IST)

    देशाला महिलावर्गाचा हातभार लागेल तर देश प्रगतीपथावर 

    देशातील महिला शक्ती देशाला नवा आदर्श घालून देत आहे

    महिला शक्ती आदर्शवत शक्ती

    आपल्या घरातील महिलांना शक्ती द्या, त्यांना प्रेरणा द्या

    देशाला महिलावर्गाचा हातभार लागेल तर देश प्रगतीपथावर

  • 15 Aug 2022 08:40 AM (IST)

    आमचा आर्थिक विकासच देशाला दिशा देणार

    डिजिटल क्रांतीमुळे जगासमोर भारताचा आदर्श

    युवा पिढीसाठी नवं स्वप्न

    नव्या क्षेत्रांना घेऊन भारत प्रगती करत आहे

    भारताचा आर्थिक विकास भारतात होत आहे

    आमचा आर्थिक विकासच देशाला दिशा देणार

  • 15 Aug 2022 08:36 AM (IST)

    खासगी क्षेत्रालाही नरेंद्र मोदींचे आवाहन

    देश नवनिर्मितीचं केंद्र बनत आहे

    भारतीयांना आत्मनिर्भर बनायचे आहे

    आत्मनिर्भर बनून जगासमोर आदर्श ठेऊया

    विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे

    खासगी क्षेत्रालाही मी आवाहन करत आहे

    लघू-सूक्ष्म उद्योगांसोबत जगात आदर्श निर्माण करायचा आहे

  • 15 Aug 2022 08:30 AM (IST)

    आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिक, प्रत्येक सरकारची जबाबदारी

    कधी पर्यंत इतरदेशांवर अवलंबून राहणार

    आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिक, प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे

    हा सरकारी काम नाही

    ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावेळी तिरंगा ध्वजाला सलामी देण्याचं काम भारतीयांना मिळाला

    आत्मनिर्भर भारतासाठी संघटित काम करा

    आत्मनिर्भर भारतासाठी सैनिकांना माझा सलाम

  • 15 Aug 2022 08:23 AM (IST)

    देशातील प्रत्येक भाषेचा अभिमान असायला हवा : पंतप्रधान

    देशातील प्रत्येक भाषेचा अभिमान असायला हवा : पंतप्रधान

    मोठ्या संकल्पामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले.

    सुविधा देशवासीयांपर्यंत झपाट्याने पोहोचत आहेत.

    देशातील प्रत्येक भाषेला अभिमान वाटला पाहिजे.

    25 वर्षे ही भारताची स्वप्ने पूर्ण करण्याची वर्षे

  • 15 Aug 2022 08:19 AM (IST)

    सामर्थ्यामुळेच जगाचे भारताकडे लक्षः पंतप्रधान नरेंद्र मोदी

    भारताला मिळालेला वारसा जगासमोर आदर्श

    योग, आयुर्वेदसारखी क्षेत्र जगासमोर आदर्श

    सामर्थ्यामुळेच जगाचे भारताकडे लक्ष

  • 15 Aug 2022 08:15 AM (IST)

    आता देशाची वाटचाल मोठा संकल्प घेऊनच: मोदी

    आता मोठ्या संकल्पाने चालायचे आहे : मोदी देशाला आता मोठा संकल्प घेऊन चालावे लागणार

    विकसित भारत, त्यापेक्षा कमी आता काही होणार नाही.

    गुलामगिरीची भावना पूर्णपणे नष्ठ करायला हवीॉ

    भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.

    पुढील 25 वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची

  • 15 Aug 2022 08:10 AM (IST)

    गुलामीचा एकही अंश आता भारतात नाही

    गुलामीचा एकही अंश आता भारतात नाही

    शेकडो वर्षातील गुलामीला नष्ट करायची आहे

    गुलामीचा एकही अंश आता भारतात नाही

  • 15 Aug 2022 08:04 AM (IST)

    सर्वसमावेशकतेमुळेच देशात अनेक चळवळी आणि क्रांती 

    राजकारणात सर्वसमावेशकता असेल तर विकासाला चालना

    भारतातील सामुहिक शक्तीनीच स्वातंत्र्य लढ्याला बळ

    सर्वसमावेशकतेमुळेच देशात अनेक चळवळी आणि क्रांती

  • 15 Aug 2022 08:00 AM (IST)

    स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला

    प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली

    कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही

    स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला

  • 15 Aug 2022 07:57 AM (IST)

    महात्मा गांधी, बोस, आंबेडकर, सावरकर यांचं स्मरण करण्याची ही वेळ

    ‘महात्मा गांधी, बोस, आंबेडकर, सावरकर यांचं स्मरण करण्याची ही वेळ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागवल्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी

  • 15 Aug 2022 07:55 AM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आम्हाला गर्व ः पंतप्रधान नरेंद्र मोदी

    दलित, पिडीत,वंचित, आदिवासी, महिला, युवा

    भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची ही मोठी पहाट

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आम्हाला गर्व

    भारतातील प्रत्यके घटक आज अमृत महोत्सव साजरा करत आहे

  • 15 Aug 2022 07:52 AM (IST)

    भारताची विविधता हीच भारताची खरी ताकदः नरेंद्र मोदी

    भारताची विविधता हीच भारताची खरी ताकदः नरेंद्र मोदी

    भारत ही लोकशाहीची जन्मभूमी

    लोकशाही हेच भारताचे खरे सामर्थ्य

  • 15 Aug 2022 07:49 AM (IST)

    ब्रिटीशांच्या लढ्याविरोधात भारतीयांनी हार मानली नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी

    ब्रिटीशांच्या लढ्याविरोधात भारतीयांनी हार मानली नाही

    स्वातंत्र्यासाठी कित्येक भारतीयांनी लढा दिला

  • 15 Aug 2022 07:40 AM (IST)

    क्रांतिवीरांनी ब्रिटिशांची झोप उडवलीः पंतप्रधान नरेंद्र मोदी

    स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी भारतीय वीरांगणाही मागे राहिल्या नाहीत…

  • 15 Aug 2022 07:38 AM (IST)

    देशानं गुलामीच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला; पंतप्रधान नरेंद्र मोदी

    स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करत आहेत…

  • 15 Aug 2022 07:36 AM (IST)

    नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन लाईव्ह :

    Narendra Modi Speech Live नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन लाईव्ह :

  • 15 Aug 2022 07:32 AM (IST)

    Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले, थोड्याच वेळात पार पडणार ध्वजारोहण

  • 15 Aug 2022 07:31 AM (IST)

    महात्मा गांधी यांना मोदी यांनी वाहिली आदरांजली

    स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली महात्मा गांधी यांना आदरांजली, पाहा व्हिडीओ

Published On - Aug 15,2022 7:29 AM

Follow us
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...