Indurikar Maharaj Video : ‘तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’, इंदुरीकर महाराजांनी कार्यकर्त्यांना सुनावलं

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी नेमक्या आणि चपखल शब्दात भाष्य केलंय. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, अशा शब्दात त्यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. चाळीसगावमध्ये त्यांचं कीर्तन सुरु होतं.

Indurikar Maharaj Video : 'तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा', इंदुरीकर महाराजांनी कार्यकर्त्यांना सुनावलं
इंदुरीकर महाराजImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 7:22 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीचा आज पाचवा दिवस आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. तर सरकार बहुमतात आहे, सरकारला कुठलाही धोका नाही असं महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते सांगतात. या सगळ्या सत्तानाट्यात जनता मात्र होरपळत आहे. तर सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहेत. सध्याच्या राजकारण जी काही उलथापालथ सुरु आहे, त्यावर कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी नेमक्या आणि चपखल शब्दात भाष्य केलंय. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, अशा शब्दात त्यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. चाळीसगावमध्ये त्यांचं कीर्तन सुरु होतं.

‘कुणाला आमदार म्हणावं हेच कळत नाही, जनतेचा भरडा होतोय’

‘खुर्चीच्या लोभासाठी विरोधकही एकत्र आलेत. तुम्हाला विचारलं का त्यांनी, आम्ही एकत्र येतोय असं? कुणी म्हणेल का त्यांना विरोधक? तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’, अशी टोलेबाजी इंदुरीकर महाराज यांनी केलीय. इतकंच नाही तर तीन दिवस झाले कुणालाच सुधरत नाही. बटन दाबलं की ऐकू येतं ब्रेकिंग न्यूज, बैठक सुरु, तुम्ही मात्र असंच मरणार. आज जे चाललंय ते पंचांगानं सांगितलं होतं. कुणाला आमदार म्हणावं हेच कळत नाही. जनतेचा भरडा होतोय, सध्याची फक्त एकच ब्रेकिंग न्यूज असते मिटिंग सुरु, खलबतं, आता लोकच बधीर झालेत’, असा खरमरीत टोलाही त्यांनी लगावलाय.

इंदुरीकर महाराजांनी आमदारांनाही सुनावलं

इतकंच नाही तर राज्यसभा निवडणुकीतील आमदारांची मतं बाद झालेल्या मुद्द्यावरुनही इंदुरीकर महाराजांनी आमदारांना सुनावलं. शिकून काय करणार, ज्यांच्याकडे तालुके आहेत त्यांना शिकवावं लागतं मतदान कसं करायचं. त्यांची तीन वेळा बैठक घ्यावी लागते. झाकली मुठ लाखाची, आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं, अशी सध्याची राजकीय स्थिती असल्याचं इंदुरीकर यांनी म्हटलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.