उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट! भेटीचं कारण काय?

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर अंबानी आणि शिंदे यांच्या भेट! भेटीदरम्यान, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट! भेटीचं कारण काय?
अंबानींनी का घेतली शिंदेंची भेट?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 6:58 AM

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. शनिवारी रात्री उशिरा अनंत अंबानी (Anant Ambani) हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीमागचं कारण नेमकं काय होतं, हे कळू शकलेलं नाही. मात्र अंबानी-शिंदे भेटीमुळे आता तर्क वितर्क लढवले जात आहेत.

अनंत अंबानी हे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे सुपुत्र आहेत. काही आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि रतन टाटा भेटदेखील झाली होती. उद्योगपतींसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. दरम्यान, अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी झालेल्या चर्चा गुलदस्त्यात आहे. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे आणि रतन टाटा यांच्यात भेट झाली होती.

दुसरीकडे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अदानी आणि ठाकरे भेटीला अवघे काही दिवस उलटले आहेत. त्यानंतर आता शनिवारी शिंदे-अंबानी यांच्यात झालेली भेट ही अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जातेय.

भेटीचं कारण काय?

अनंत अंबानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या भेटीदरम्यान, शिंदे-अंबानी यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आगामी प्रकल्पांबाबत राज्य सरकारचं सहकार्य मिळावं, यासाठी ही भेट झालेली असू शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय.

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरवला गेला असल्याची टीका केली जात होती. यानंतर सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे भेट ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जातेय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.