Dr. Deepak Sawant | दोन्ही डोस घेऊनही दुसऱ्यांदा लागण! डॉ. दीपक सावंत कोविड पॉझिव्हट, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रासह मुंबईत आज सर्वाधक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात जवळपास चार हजार तर मुंबईक अडीच हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत (Dr. Deepak Sawant) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आला आहे. यानंतर पुढील उपचासाठी त्यांना अंधेरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना सर्दी, खोकला, अंगदुखी आणि किंचित ताप येत होता. कोरोना सदृश्य सक्षण आढळल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.
दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!
दरम्यान, याआधी जून महिन्यात डॉ. दीपक सावंत यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांना डॉ.दीपक नामजोशी यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या होत्या. तर आज अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये त्यांना परत मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या असून त्यानंतर दीपक सावंत यांना घरी विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत.
फुल्ली व्हॅक्सिनेट तरिही पॉझिटिव्ह
दरम्यान, डॉ. दीपक सावंत यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. तरिही त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. 16 जानेवारी रोजी पहिला तर 16 फेब्रुवारी रोजी दुसरा कोरोना लसीचा डोस डॉ. दीपक सावंत यांनी घेतला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यानं आता बुस्टर डोसबाबत नेमके काय निकष असणार आहेत, हेही पाहणं महत्त्वाचंय. त्या अनुषंगानं त्यांनी आसीएमआरनं निकष ठरवणं गरजेचं असल्याचं मतही व्यक्त केलं आहे.
सुप्रिया सुळेंनाही लागण
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. काल दिनांक 28 डिसेंबर रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांनीदेखील ट्विट करून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे इतर मंत्र्यांनाही बाधा होते की काय ही चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेचा धोका?
दरम्यान, महाराष्ट्रासह मुंबईत आज सर्वाधक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात जवळपास चार हजार तर मुंबईक अडीच हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहे.
काय आहे आजची आकडेवारी?
- महाराष्ट्रातील आजचे नवे रुग्ण – 3900
- आज किती मृत्यू – 20
- रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 97.61%
- किती रुग्ण आज बरे झाले – 1306
- होम क्वारंटाईनमध्ये किती – 122906
- ओमिक्रॉनचे किती नवे रुग्ण – 85
ओमिक्रॉनचे कुठे किती रुग्ण?
- मुंबई – 3
- नागपूर आणि पिंपरी चिंचवड- प्रत्येकी 3
- नवी मुंबई आणि पुणे मनपा – प्रत्येकी 2
- पनवेल, कोल्हापूर आणि बुलढाणा – प्रत्येकी 1
इतर बातम्या –
शेअर्सप्रमाणे सोन्याचं ट्रेडिंग : EGR ‘सिक्युरिटीज’च्या कक्षेत, अर्थ मंत्रालयाचा निर्णय
Corona : मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? 9 दिवसातली रुग्णवाढ नाकी नऊ आणणारी
Poisonous Animals : ‘या’ धोकादायक प्राण्यांपासून दूर राहा, अन्यथा जीवही जाऊ शकतो!