ठाकरे घराण्यातील पहिला आमदार; शिवसेनेतील तेजस्वी युवापर्व; जाणून घ्या, आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास!

प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव ही आदित्य ठाकरे यांची खरी ओळख आहे. (Interesting Facts About Aaditya Thackeray You Didn't Know Before)

ठाकरे घराण्यातील पहिला आमदार; शिवसेनेतील तेजस्वी युवापर्व; जाणून घ्या, आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास!
Aaditya Thackeray
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 7:41 AM

मुंबई: प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ चिरंजीव ही आदित्य ठाकरे यांची खरी ओळख आहे. मात्र, असं असलं तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतंत्र छाप उमटवली आहे. आदित्य ठाकरेंकडे आजोबा-पणजोबांसारखी वक्तृत्व शैली नाही. पण काय बोलायचं आणि किती बोलायचं याची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच नवीन मंत्री असूनही ते मीडियाला लिलया सामोरे जातात. उत्तम संघटन कौशल्य, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि तरुणाईंमधील त्यांच्याविषयीची क्रेझ या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. (Interesting Facts About Aaditya Thackeray You Didn’t Know Before)

13 जून 1990 ही आदित्यठाकरे यांची जन्म तारीख. वडील उद्धव ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे. आदित्य यांचं माहीमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून शालेय तर सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीपर्यंतच शिक्षण झालं आहे. तर केसी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तेजस ठाकरे हे त्यांचे लहान बंधू आहेत.

कवी आणि गीतकारही

ठाकरे घराणं आणि कला हे एकप्रकारचं रक्ताचं नातं आहे. कलेचा हा वारसा आदित्य यांच्याकडेही आला आहे. आदित्य एक चांगले कवी आणि गीतकार आहेत. त्यांच्या इंग्रजी कवितांचा ‘माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. 2007 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचा ‘उम्मीद’ हा गीतांचा अल्बम आला. या अल्बममध्ये त्यांची एकूण आठ गाणी आहेत.

पहिलं आंदोलन

पणजोबा प्रबोधनकार ठाकरे थोर समाजसुधारक. आजोबा बाळासाहेब ठाकरे देशातील महत्त्वाचे नेते. वडील उद्धव ठाकरेही महत्त्वाचे नेते असल्याने आदित्य यांना लहानपणापासूनच घरातच राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच तेही राजकारणाकडे वळले नसते तर नवलच! 2010मध्ये मुंबई विद्यापीठात शिकत असताना आदित्य यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं. अनिवासी भारतीय रोहिंग्टन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ या पुस्तकाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या नेतृत्वातील आंदोलनात या पुस्तकाची होळी करण्यात आली होती. मराठी भाषेबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने हे आंदोलन करण्यात आलं होतं.

ऐतिहासिक क्षण

2010 हे वर्षे आदित्य यांच्यासाठी ऐतिहासिकच म्हणावं लागेल. 2010च्या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवा सेनेची घोषणा केली. यावेळी हजारो लोकांच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदित्य यांच्याकडे युवा सेनेची जबाबदारी सोपवली. आदित्य यांनीही स्टेजवरच हजारो लोकांसमोर नतमस्तक होत ही जबाबदारी स्वीकारली आणि आदित्य यांचा खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला.

बाळासाहेबांची महाराष्ट्राला साद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 2012च्या दसरा मेळाव्यात हजारो शिवसैनिकांशी संवाद साधला होता. यावेळी शिवसेनाप्रमुख अत्यंत भावनिक झाले होते. ‘उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांना सांभाळा,’ असं भावनिक आवाहन बाळासाहेबांनी केलं होतं. त्यामुळे शिवसैनिकही गहीवरून गेले होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर प्रबोधनकारांनीही ‘माझा बाळ महाराष्ट्रासाठी अर्पण करत आहे’, असं उद्गार काढलं होतं. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्र पाहात होता.

युवा सेनेची बांधणी

आदित्य यांनी शिक्षण घेताघेता युवा सेनेचीही बांधणी सुरू ठेवली होती. मुंबई विद्यापीठात त्यावेळी मनसेचा बोलबाला झाला होता. मात्र, युवा सेनेने विद्यापीठात आपलं वर्चस्व निर्माण केलं. सिनेटच्या निवडणुकीत एखाद दोन जागांचा अपवाद वगळता युवा सेनेने सर्वच जागा जिंकल्या होत्या. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच युवा सेनेला विद्यापीठात वर्चस्व निर्माण करता आलं होतं.

महापालिकेकडे लक्ष

युवा सेनेने जम बसविल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कामातही लक्ष घातलं. मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी प्रचारास सुरुवात केली. रॅली, डोअर टू डोअर व्हिजिट करून त्यांनी मतदारांना आपलसं केलं. वडील उद्धव ठाकरे यांना खंबीरपणे साथ देत त्यांनी प्रचार केला. त्यामुळे शिवसेनेला महापालिकेत सत्ता राखणं सोपं झालं.

समाजकार्यात आघाडीवर

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचं ब्रीद आहे. त्यानुसार शिवसैनिक काम करत असतात. आदित्य ठाकरेही त्यात मागे राहिले नाहीत. त्यांनी दुष्काळी भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. कर्जत, कसारा, मोखाडाचा भाग असो की मराठवाडा, विदर्भातील भाग असो… या भागात जाऊन आदित्य यांनी गोरगरीबांना मदत केलेली आहे.

ठाकरेंचं धक्कातंत्र, पहिला निर्णय

ठाकरे घराण्याचं आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे धक्कातंत्र. शिवसेना प्रमुखांनी अनेकदा प्रवाहाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले आहेत. अर्थात त्यामागे त्यांची ठाम भूमिका असायची. त्यासाठी ते नुकसानीची पर्वा करत नसायचे. उद्धव ठाकरे यांनीही असाच धक्कादायक निर्णय घेतला. आपल्या रिमोटवर सरकार चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबाने थेट निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. 2019मध्ये आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिलेच ठरले. या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना 89248 मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांना 21821 मते मिळाली. आदित्य ठाकरे 67 हजाराहूंन अधिक मताधिक्यानं विजयी झाले.

बापलेक मंत्रिमंडळात

2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. निवडणुकीनंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरून युतीत बिनसले आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास विकास आघाडी राज्यात उदयास आली. या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं. उद्धव ठाकरे राज्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आदित्य यांनाही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. 30 डिसेंबर 2019 रोजी त्यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रीपद देण्यात आलं. एकाच मंत्रिमंडळात बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

वाटचाल:

2010: युवा सेनेच्या अध्यक्षपदी निवड 2017: मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड 2018: शिवसेनेच्या नेतेपदी निवड 2019: वरळीतून विधानसभेवर विजयी 2019: पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्रीपदी नियुक्त 2020: मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती (Interesting Facts About Aaditya Thackeray You Didn’t Know Before)

संबंधित बातम्या:

पानटपरी चालक ते मंत्री; गुलाबराव पाटलांबाबत हे माहीत आहे का?

पत्रकार ते आमदार, कशी आहे कपिल पाटील यांची राजकीय वाटचाल?; वाचा सविस्तर!

मतदारांच्या ‘कार्यसम्राट आमदार’; वाचा, कसा आहे मोनिका राजळेंचा राजकीय प्रवास!

(Interesting Facts About Aaditya Thackeray You Didn’t Know Before)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.