Nupur Sharma : इरफान पठाण, गौतम गंभीरकडून नुपूर शर्माचं समर्थन? नेमकं काय म्हणालेत दिग्गज क्रिकेटपटू? जाणून घ्या….

नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केलाय.

Nupur Sharma : इरफान पठाण, गौतम गंभीरकडून नुपूर शर्माचं समर्थन? नेमकं काय म्हणालेत दिग्गज क्रिकेटपटू? जाणून घ्या....
गौतम गंभीर Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 11:31 AM

नवी दिल्ली :  क्रिकेटमधील दिग्गज नामवंत खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि गौतम गंभीर (gautam gambhir) नुपूर शर्माच्या वक्तव्यावर बोलले आहेत. प्रेषित मुहम्मद यांच्यावरील भाजपच्या माजी प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानानंतर भारतातील अनेक शहरांमध्ये निदर्शनं झाली आणि काही ठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले. एवढेच नाही तर तिला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. यापूर्वी नुपूरनं (Nupur Sharma) माफी देखील मागितली आहे. नुपूरची भाजप पक्षाच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, देशातील काही सुजाण नागरिकांमुळे हे प्रकरण दिवसेंदिवस मोठे होत आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केली होती. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी त्यावर भाष्य केलंय. विशेष म्हणजे यावर इरफान पठाणही बोलला आहे. त्यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ गंभीर आला?

शर्माला पाठिंबा देत गंभीरने ट्विट केले की, ‘माफी मागणाऱ्या महिलेविरुद्ध देशभरात द्वेषाचे भयंकर प्रदर्शन आणि तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तथाकथित ‘सेक्युलर लिबरल’चे मौन वेडे ठरणार आहे.’

हे सुद्धा वाचा

गौतम गंभीरचे ट्विट

इरफानचं ट्विट, पाहा काय म्हणाला इरफान

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध सुरूच

टीव्हीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. हा वाद चिघळू नये, या विचाराने भाजपने शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, असे असतानाही शर्मा यांच्याविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. काही अतिरेक्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) खासदार इम्तियाज जलील यांनी शर्मा यांना फाशी देण्याची मागणी केली होती.

नेमकं प्रकरण काय?

  1. प्रेषित मुहम्मद यांच्यावर भाजपच्या महिला प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान
  2. वक्त्यावचे देशासह जगभरात पडसाद
  3. यानं नुपूरनं माफी देखील मागितली आहे
  4. नुपूरची भाजप पक्षाच्या सदस्यत्वातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
  5. इतर देशांनीही भारतावर नाराजी व्यक्त केली आहे
  6. दरम्यान, नुपूर शर्मानं मानं मांडलेली भूमिका आमची नाही, असं भाजपनं म्हटलंय.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.