Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख 14 डिसेंबर का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis : "मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती यासाठी दिली कारण त्यांनी 2014 साली रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन प्रचाराची सुरुवात केली होती. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड श्रद्धा आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालतात. म्हणून मी ती मुर्ती दिली"

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख 14 डिसेंबर का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
सरकार स्थापनेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीवेळी महाराष्ट्रातील संस्कृतीचे दिल्लीत अनोखे दर्शन पाहायला मिळाले.
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 1:23 PM

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मंत्रिमंडळ विस्तारावरुन महायुतीमध्ये तिढा आहे का? गृह खात्यावरुन पेच अडलाय का? कुठल्या पक्षाला किती मंत्रिपद? कुठली खाती ? याचा तिढा सुटत नाहीय का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सरु आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाच्या प्रश्नांना उत्तर दिली. नरेंद्र मोदी यांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाच उत्तर मोदींकडून देवेंद्र ऐकायला मिळत होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस बोलले.

“मोदीजी आमचे सर्वोच्च नेते आहेत. आमच्या पक्षाच पितृतुल्य नेतृत्व आहे. आमच्या सगळ्यांच स्पेशल कनेक्शन मोदींसोबत आहे. त्याचं प्रेम, मार्गदर्शन नेहमी मिळतं. काही चुकलं तर प्रसंगी ते रागवतात. ते पालकाच्या भूमिकेत आहेत. त्यांना भेटणं ही आनंदाची गोष्ट आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती यासाठी दिली कारण त्यांनी 2014 साली रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन प्रचाराची सुरुवात केली होती. त्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड श्रद्धा आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरुन चालतात. म्हणून मी ती मुर्ती दिली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार-शरद पवार भेटीवर काय प्रतिक्रिया?

मंत्रिमंडळाचा शपथविधी 14 तारखेला होणार का? त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘तारीख तुम्ही ठरवली. आम्ही अजून ठरवायची आहे’ अजित पवार शरद पवार यांना भेटले, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “शरद पवार यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष देवो. ते देशाची, राज्याची सेवा करतायत ती त्यांनी करत रहावी”

‘थोडी वाट पहा’

“परभणीत जे काही घडलं, संविधानाबाबत त्या माथेफीरुने जे काही केलं, त्याचा निषेध केला पाहिजे. तो माथेफिरु मनोरुग्ण आहे, त्याला लगेच अटक झाली. अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होणं योग्य नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्यांनी संवैधानिक मार्ग स्वीकारला पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही होणार का? यावर थोडी वाट पहा असं उत्तर दिलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.