AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Raid : उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत 22 ठिकाणी धाडी; आयकर विभागाच्या जाळ्यात कोण कोण?

Income Tax Raid : आयकर विभागाने नुकतेच मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये छापे मारले होते. याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने ही छापेमारी केली असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आयकर विभागाने गेल्या काही दिवसांपासून देशभरात झाडाझडती सुरू केली आहे.

Income Tax Raid : उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत 22 ठिकाणी धाडी; आयकर विभागाच्या जाळ्यात कोण कोण?
उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत 22 ठिकाणी धाडी; आयकर विभागाच्या जाळ्यात कोण कोण? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 1:19 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशात (uttar pradesh) भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू झाली आहे. आयकर विभागाने (Income Tax Raid) उत्तर प्रदेश आणि दिल्लीत (new delhi) एकूण 22 ठिकाणी छापे मारले आहेत. लखनऊ, कानपूर आणि दिल्लीसहीत 22 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. मोठा पोलीस बंदोबस्तात ही छापेमारी सुरू आहे. अनेक दस्ताऐवजांची छाननी करण्यात येत आहे. किती वेळ ही छापेमारी चालेल याची काहीच माहिती नाही. तसेच ज्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे, त्या परिसरात कुणालाही येण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक भ्रष्ट नोकरशहा आयकर विभागाच्या रडारवर आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. UPICONशी संबंधित कंत्राटदारांवर छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आयकर विभागाने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत एकाच वेळी 22 ठिकाणी छापेमारी केल्याने उद्योग जगत आणि नोकरशहांचे धाबे दणाणले आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक विभागात कार्यरत असलेले दीड डझन अधिकारी आणि कर्मचारी आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरावर सकाळपासूनच ही छापेमारी सुरू असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. नवी दिल्लीतही हीच परिस्थिती आहे.

या ठिकाणी कारवाई

>> उद्योग विभाग ( Department of Industris ,UP ) >> उद्धमिता विकास संस्थान (The Institute of Entrepreneurship Development, U.P. (IDUP), Lucknow ) >> उद्धमिता प्रशिक्षण संस्थान >> यूपी इंडस्ट्रियल कन्सल्टंट लिमिटेड ( UP Industrial Consultants Ltd. (UPICO ) >>  प्रायव्हेट सेक्टर (Privat Sector ) >>  अन्य (Others )

हे सुद्धा वाचा

झाडाझडती सुरूच

आयकर विभागाने नुकतेच मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये छापे मारले होते. याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने ही छापेमारी केली असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आयकर विभागाने गेल्या काही दिवसांपासून देशभरात झाडाझडती सुरू केली आहे. महाराष्ट्रात जालना आणि इतर जिल्ह्यात आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आयटीची ही झाडाझडती या पुढेही सुरूच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.