Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही: चंद्रकांत पाटील

मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. | Chandrakant Patil

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही: चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 3:27 PM

पुणे: शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. सध्या ते आपल्या तालावर सरकारही चालवत आहेत. मग ज्यादिवशी पवारांना वाटेल तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच मुख्यमंत्री करावे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. मराठा समाजातील महिला मुख्यमंत्री कोण हा आम्ही ठरवण्याचा विषय नाही. जिच्यात क्षमता आहे ती स्त्री मुख्यमंत्री व्हावी. त्यात कोणत्या एका समाजाचं असं काही नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. (Chadrakant Patil reaction on Who will be the Maratha women CM of Maharashtra)

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना शनिवारी पुण्यात याविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी मराठा महिला मुख्यमंत्री कोण, हा आम्ही ठरवण्याचा विषय नसल्याचे स्पष्ट केले. उद्या शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करावेसे वाटले तर त्यांनी करावे. त्यात आमचा रोल काय? आम्ही सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री केले होते. त्यामुळे भाजपने कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर तर वेळ लागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास सरकारच्या कारभारावरही टीकास्त्र सोडले. हे सरकार अत्यंत गोंधळलेले आहे. कशाचा कशाला पत्ता नाही. 1 जानेवारीपासून शाळा सुरु करावी, म्हणजे मुलं मानसिकदृष्ट्या मोकळी होतील, असा पर्याय मी सुचवला होता. परीक्षेच्याबाबतीतही सरकारने सगळं भजं करून ठेवले आहे. मात्र, सरकार लहान मुलांच्या मनाशी खेळत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

आशिष शेलार काय म्हणाले होते? ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (Vijay Chormare) यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ (Kartutvavan Maratha Striya) या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

शेलार काल म्हणाले, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, आज म्हणाले, आमचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदी…..

पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार

(Chadrakant Patil reaction on Who will be the Maratha women CM of Maharashtra)

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.