सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तपासावं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ: संजय राऊत

भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे संकटमोचक संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी खुलेपणाने संवाद साधला. | Sanjay Raut

सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तपासावं, आत्मपरीक्षण करण्याची वेळ: संजय राऊत
पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 9:39 AM

मुंबई: सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. (Shivsena leader Sanjay Raut tweet after Parambir singh letter bomb)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेचे संकटमोचक संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी खुलेपणाने संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी अनेक परखड मतं मांडली. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो, स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

शरद पवार योग्य निर्णय घेतील: राऊत

या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन, असे राऊत यांनी सांगितले.

परमबीर सिंह यांच्याविषयी संजय राऊत यांनी समतोलपणे भूमिका मांडली. परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्म सेवा बजावली आहे. मात्र, परमबीर सिंह यांनी पत्रात लिहलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून पाहतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

‘विरोधी पक्षाच्या मागणीने सरकार चालत नाही’

विरोधी पक्षाच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. संबंधित बातम्या:

आयुक्तांच्या लेटरबॉम्बनंतर ठाकरे सरकार अडचणीत; संजय राऊतांचं सूचक ट्विट

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांच्या ‘लेटर बॉम्ब’ची राज्य सरकारकडून शहानिशा होणार!

Parambir Singh Letter : परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे, अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार- अनिल देशमुख

(Shivsena leader Sanjay Raut tweet after Parambir singh letter bomb)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.