दसरा मेळाव्यानंतर आणि एका ठाकरेंचे नाव चर्चेत; या ठाकरेंचे वडिल शिंदे गटाच्या मेळाव्यात दिसले
दसरा मेळाव्यानंतर आणि एका ठाकरेंचे नाव चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे या ठाकरेंचे वडिल शिंदे गटाच्या मेळाव्यात सहभागी झाले होते.
मुंबई, दिनेश दुखंडे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांसह आणखी एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे ठाकरे कुटुंबातील सदस्यांची. 3 इतर ठाकरे बीकेसी मैदानातल्या शिंदेंच्या मंचावर पोहोचले. दसरा मेळाव्यानंतर आणि एका ठाकरेंचे नाव चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे या ठाकरेंचे वडिल शिंदे गटाच्या मेळाव्यात सहभागी झाले होते.
शिंदे गटाच्या मेळाव्याला उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मंचावर आले. उद्धव ठाकरेंच्या दुसरे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंच्या वहिनी स्मिता ठाकरेंनी शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली.
दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील दोन सदस्यांची वेगवेगळी उपस्थिती पहायला. BKC एमएमआरडीए मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात वडिलांची, तर शिवाजी पार्कात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्याला मुलाची उपस्थिती पहायला मिळाली.
शिंदे गटाच्या मेळाव्याला जयदेव ठाकरेंची, तर ठाकरे गटाच्या मेळाव्याला त्यांचे चिरंजीव जयदीप ठाकरे यांनी हजेरी लावली. जयदीप ठाकरे हे पहिल्यांदाच शिवाजी पार्कवर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित होते.
जयदीप ठाकरे हे व्यासपीठासमोर असलेल्या व्हीव्हीआयपिंसाठी राखीव आसन व्यवस्थेत उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांसोबत बसले होते.