नीतेश राणेंना जेल की बेल, आज दुपारी फैसला, अटकेची टांगती तलवार कायम, पण नीतेश आहेत कुठं?
ते कुठे आहेत हे मी का सांगू असं वक्तव्य काल नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग कोर्ट आज काय निकाल देतं त्यावर राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
भाजप आमदार नीतेश राणे (Jail or Bail for Nitesh Rane) यांना जेल होणार की बेल मिळणार याचा फैसला आज दुपारी 3 वाजल्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयात होणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे फक्त कोकणाचंच नाही तर राज्याच्या राजकीय वर्तूळाचं लक्ष लागलंय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होऊ घातलीय. त्याच पार्श्वभूमीवर महाआघाडीचे प्रचारप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी 5 आरोपींना अटक केलीय. त्यातला एक जण हा नीतेश राणेंच्या स्वाभिमानचा पुण्यातील कार्यकर्ता असल्याची माहिती मिळतेय. हा हल्ला नीतेश राणे आणि गोट्या सावंत ह्या दोघांच्या सांगण्यावरुन केल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केलेला आहे. नीतेश राणे हे सध्या तरी गायब आहेत. ते कुठे आहेत हे मी का सांगू असं वक्तव्य काल नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग कोर्ट आज काय निकाल देतं त्यावर राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
काल काय घडले? नीतेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यातून सुटका व्हावी म्हणून अटकपूर्व जामीनासाठी आधी त्यांनी प्रयत्न केले पण त्यात यश आलं नाही. नंतर काल त्यांच्या वकिलाने सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या (Sindhudurg Cooperative Bank Election) मतदानाचं कारण सांगत अंतरिम जामीन मागितला. तो सुद्धा फेटाळला गेला. काल दुपारी चार वाजता सुनावणीला सुरुवात झाली जी तीन तासापेक्षा जास्त वेळ चालली. नीतेश राणेंची बाजू त्यांचे वकिल संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे यांनी मांडली तर सरकारी वकिल म्हणून प्रदीप घरत केस लढवतायत. फिर्यादी संतोष परब यांच्या बाजूनं विकास पाटील शिरगावकर लढतायत. साडे सहा वाजता कोर्टाचं कामकाज संपलं. त्यानंतर राणेंच्या वकिलानं दहा मिनिटांची वेळ वाढवून मागितली. त्याच वेळेस त्यांनी अंतरिम जामीनाची मागणी केली जी फेटाळली गेली.
नीतेश राणेंच्या वकीलाचा युक्तीवाद काय?
1.हल्ल्यानंतर आरोपीनं फोनवरुन संपर्क केल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे पण एखादा आरोपी असा भररस्त्यात फोन करेल?
2. विधान भवनाच्या पायऱ्यांवर नीतेश राणेंनी जे काही केलं त्याचा राग मनात धरुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय.
3. नीतेश राणे आणि आरोपी सचिन सातपुते यांचा सीडीआर पोलीसांना मिळाला असेल तर मग समोरासमोर त्यांची चौकशी करण्याची गरज काय?
सरकारी वकीलाचा युक्तीवाद काय?
- विधान भवनाच्या पायऱ्यावर जे काही घडले त्याचा कोर्टातल्या कारवाईशी काय संबंध? जर लोकांसमोर भर रस्त्यात आरोपी चाकुहल्ला करु शकतात तर ते काय फोनवरु नीतेश राणे, गोट्या सावंतला फोनवरुन हल्ला केल्याचे सांगू शकत नाहीत.
2. पोलीसांवर तुमच्या दोन भूमिका का? एकीकडे तुम्ही म्हणता की पोलीसांविरोधात तक्रार नाही, दुसरीकडे म्हणता, पोलीसांवर दबाव आहे, असे कसे?
3. सचिन सातपुते हा आधी राणेंच्या स्वाभिमानचा कार्यकर्ता होता, नंतर त्यानं भाजपात प्रवेश केला.
संतोष परबच्या वकीलांचा युक्तीवाद काय?
- संतोष परब यांच्यावर जो हल्ला झाला, तो काही अपघात नाही तर नियोजनपूर्वक हत्याराने वार केल्याचा आहे. यात मुख्य सूत्रधार हे नीतेश राणे आहेत.
2. केंद्रीय मंत्री जर केंद्रात आमचेही सरकार आहे अशी भाषा वापरत असतील तर ही आम्हाला दिलेली धमकीच आहे असं का मानू नये?
हे सुद्धा वाचा:
Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!
आता बाराही महिने हिरवा चारा, जनावरांसाठी पोषक अन् शेतकऱ्यांसाठी सोपी प्रक्रिया