भाजपला सोडचिठ्ठी, जयसिंगराव गायकवाड शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

जयसिंगराव गायकवाड यांनी दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, तर तीन वेळा बीड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व केले

भाजपला सोडचिठ्ठी, जयसिंगराव गायकवाड शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 2:59 PM

औरंगाबाद : भाजपला सोडचिठ्ठी दिलेले मराठवाड्यातील दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad Patil) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत उद्या (मंगळवार 23 नोव्हेंबर) गायकवाड पक्षप्रवेश करतील. गायकवाड यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलं आहे. (Jaisingrao Gaikwad to enter NCP in presence of Sharad Pawar)

औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. गायकवाडांची समजूत घालण्याचा प्रयत्न पक्षाने केला, परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी जयसिंगरावांनी उमेदवारी मागे घेतली खरी, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.

जयसिंगराव गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. त्यांनी दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. गेल्या काही वर्षांपासून जयसिंगराव गायकवाड सक्रिय राजकारणापासून दूर होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती

जयसिंगराव गायकवाड यांची कारकीर्द

माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री माजी सहकार राज्यमंत्री माजी मराठवाडा पदवीधर आमदार (विधानपरिषद – दोन वेळा) माजी खासदार – बीड (तीन वेळा)

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार

सदाशिव पाटील – काँग्रेस (खानापूर आटपाडी, सांगली) उदेसिंग पाडवी – भाजप (शहादा, नंदुरबार) सीताराम घनदाट (घनदाट मामा) – अपक्ष (गंगाखेड, परभणी) रमेश कदम – राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस (चिपळूण, रत्नागिरी) (Jaisingrao Gaikwad to enter NCP in presence of Sharad Pawar) एकनाथ खडसे – भाजप (मुक्ताईनगर, जळगाव) राजीव आवळे – जनसुराज्य (हातकणंगले, कोल्हापूर) जयसिंगराव गायकवाड – भाजप (विधानपरिषद आमदार/बीड खासदार)

मातब्बर नेत्याने पक्ष सोडला, बंडखोरही अडला; औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड https://t.co/9vHHNP8JkL #Aurangabad #BJP #NCP #Election #Maharashtra

— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020

संबंधित बातम्या :

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

(Jaisingrao Gaikwad to enter NCP in presence of Sharad Pawar)

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.